

Mumbai FDA Action
ESakal
मुंबई : मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरींमधील अस्वच्छता, तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष तपासणी मोहिमेत मुंबईतील नऊ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये डॉमिनोज पिझ्झासह नामांकित रेस्टॉरंट्स आणि बेकरींचा समावेश आहे.