FDA Action: कर्जतमध्ये तुकाराम मुंढेंची कारवाई! कागदपत्रांची पूर्तता नसल्याने शहरातील हॉटेल बंद

Tukaram Mundhe Action Mode: कर्जतमध्ये अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. यामध्ये कागदपत्रांची पूर्तता नसल्याने शहरातील हॉटेल बंद करण्यात आले आहेत.
 Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

esakal

Updated on

कर्जत : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागाचा कारभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कारवाईचाच भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मंगळवारी (ता. ९) तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र व कागदपत्रांची पूर्तता नसल्याने शहरातील ठाकरे हॉटेल बंद करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com