FDA Action: शिबिरांवरही एफडीएची नजर, रक्तपेढ्यांची होणार अचानक तपासणी; तफावत आढळल्यास कारवाई

FDA Action On Blood Banks: राज्यातील रक्तपेढ्या, रक्त साठवण केंद्रे आणि रक्तदान शिबिरांच्या कामकाजावर एफडीएची नजर राहणार असून तफावत आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

esakal

Updated on

मुंबई : राज्यातील रक्तपेढ्या, रक्त साठवण केंद्रे आणि रक्तदान शिबिरांच्या कामकाजावर आता अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) नजर राहणार आहे. एफडीएचे अधिकारी आणि औषध निरीक्षक यापुढे या ठिकाणी अचानक तपासणी करणार आहेत. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन, रक्तसाठ्यातील तफावत किंवा विनापरवाना कामकाज आढळल्यास संबंधित रक्तपेढीचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई होऊ शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com