

Female Lawyer Dies In Mumbai Court
ESakal
मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यायालयात हजर असलेल्या एका महिला वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या पतीने आरोप केला की, वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने आणि न्यायालयात मूलभूत वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव मालती पवार असे आहे, त्या ५९ वर्षांच्या होत्या.