esakal | कर्जाचा EMI भरायचा का नाही ? नागरिकांनी काय करायला हवं, वाचा स्पेशल रिपोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जाचा EMI भरायचा का नाही ? नागरिकांनी काय करायला हवं, वाचा स्पेशल रिपोर्ट

अनेकनाचं कामकाज बंद असल्याने वेळेवर पगार होणार की नाही,  याबाबत नोकरदारांकडून चिंता व्यक्त केली जातेय

कर्जाचा EMI भरायचा का नाही ? नागरिकांनी काय करायला हवं, वाचा स्पेशल रिपोर्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - एक एप्रिल, नवीन महिन्याचा पहिला दिवस. असं पहिल्यांदाच झालंय की नवीन महिन्याच्या सुरवातीला लॉकडाऊनमुळे अनेकांना घरी बसावं लागतंय, अनेकांचं कामकाज ठप्प आहे. अशात अनेकांना आपल्या EMI ची काळजी आहे. खरंतर गेल्या शुक्रवारीच RBI ने सर्व बँकांना पुढील तीन महिने EMI घेऊ नये असं आवाहन केलंय. मात्र रिझर्व्ह बँकेने दिलेल्या या सल्ल्यानंतर सर्व बँका अजूनही गप्प आहेत. केवळ एवढंच नाही तर सर्व बँकांकडून प्रत्येक महिन्याला तुम्हाला EMI भरण्याचा जो रिमाइंडर मेसेज येतो तो देखील पाठवलाय. अशा परिस्थितीत अनेकांच्या EMI कट होणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात आता संभ्रमाचं वातावरण आहे. 

का वाढतोय संभ्रम : 

अनेकनाचं कामकाज बंद असल्याने वेळेवर पगार होणार की नाही,  याबाबत नोकरदारांकडून चिंता व्यक्त केली जातेय. दर महिन्याला जसा रिमाइंडर मेसेज आपल्याला येतो तसा मेसेज बँकांनी ग्राहकांना पाठवलाय. तुमच्या बँकेत पर्याप्त अकाउंट बॅलन्स ठेवा, तुमचा EMI अमुक तारखेला कापला जाईल असा मेसेज आल्याने अनेकजण संभ्रमावस्थेत आहेत, अनेकांचं टेन्शन देखील वाढलंय. 

मोठी बातमी - "भरपूर पाणी प्या आणि कोरोनाला पळवा" ; काय आहे व्हायरल सत्य/असत्य ?

कुणीच आपल्या ग्राहकांचा EMI स्थगित नाही केलाय का ?  

तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण SBI ने सर्व ग्राहकांचे कर्जावरील EMI तीन महिने स्थगित केलेत. गेल्या शुक्रवारीच SBI चे चेअरमन रजनीश कुमार यांनी याबाबत माहिती दिलीये. त्यामुळे SBI च्या ग्राहकांचे पुढील तीन महिन्यांचे EMI आता कट होणार नाहीत.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाठोपाठ आता भारतातातील चार मोठ्या बँकांनी त्यांच्या कर्जधारकांना दिलासा दिला आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सर्व बँकांना पुढील तीन महिने EMI घेऊ नका असा सल्ला दिला होता. अशात आता भारतातील IDBI बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक या बँकांनी पुढील तीन महिने कर्जदारांकडून कर्जाचा हफ्ता न घेण्याचा निर्णय घेतलाय. बँकांच्या या निर्णयामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळालाय. 

यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचं ऍप्लिकेशन देण्याची गरज नाही, आपोआपच पुढील तीन महिन्यांसाठी EMI कट होणार नाही. या तीन महिन्यात EMI न भरल्याने कुणाचाही क्रेडिट स्कोअर खराब होणार नाही. दरम्यान SBI च्या माहितीप्रमाणे केवळ कर्ज ग्राहकांचे EMI स्थगित करण्यात आलेले आहेत. SBI क्रेडिटकार्ड पेमेंटबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

मोठी बातमी - कोरोनामुळे आपल्या आसपास झालेत 'हे' चांगले बदल; बातमी वाचाल तर छान वाटेल... 

आता या परिस्थितीत तुम्ही काय कराल ? 

तुमच्या बँकेने EMI स्थगित गाळण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला मेसेज किंवा ई-मेलच्या माध्यमातून नक्की कळवण्यात येईल. किंवा तुम्ही बँकेच्या कॉल-सेंटरला फोन करून याबाबत विचारणा करू शकतात. तुम्ही बँकेला याबाबत अर्ज देखील देऊ शकतात. यामध्ये कोरोनामुळे तुम्हाला न मिळणाऱ्या पगाराबाबत स्पष्टता द्यावी लागेल. याबाबत शेवटचा निर्णय बँकेकडूनच घेतला जाईल. जर बँकेने कोणताही निर्णय घेतला नाही तर मात्र तुमचा EMI दरमहिन्याप्रमाणे कट होत राहणार आहे.

fight against corona even after RBIs request to banks are we suppose to pay EMIs or not