धारावीतील कोरोना बाधितांसाठी महापालिकेचं मोठं पाऊल, महापालिकेने घेतलं...   

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

या सेवेसाठी बीएमसी साई हॉस्पिटलला प्रतिमाह ३० लाख रुपये देणार आहे, असं बीएमसीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय

मुंबई :महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे खरबदारीचा उपाय म्हणून प्रशासन योग्य ती पावलं उचलत आहे. आशिया खंडातील सर्वात गजबजलेला आणि दाट लोकवस्तीचा भाग म्हणून ओळख असलेल्या धारावीमध्ये तब्बल ७ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे प्रशासन अधिकच सतर्क झालं आहे.

१८९७च्या साथीच्या रोगाच्या कायद्यानुसार बीएमसीनं धारावीतलं 'साई हॉस्पिटल' आपल्या कक्षेत घेतलं आहे. धारावीतल्या कोरोनबाधीत रुग्णांना सहज आणि जलद उपचार मिळावेत म्हणून धारावीतल्या साई हॉस्पिटलचे संपूर्ण ५१ बेड बीएमसीनं कोरोनग्रस्तांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच साई हॉस्पिटल हे विलगीकरण आणि उपचार केंद्र म्हणून घोषित करण्यात आलंय.

मोठी बातमी - धारावीकरांनो सावधान ! आज 'ही' धक्कादायक बातमी आली समोर...

धारावीत तब्बल साडे आठ लाख लोकं दाटीवाटीनं राहतात. त्यामुळे इथे कोरोनाच्या संसर्गाचा धोका सर्वात जास्त आहे. त्यामुळे बीएमसीनं खबरदारी घेत साई हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करण्यातही ५१ बेड्स सज्ज केले आहेत. तसंच या हॉस्पिटलचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारीही बीएमसीच्या डॉक्टरांसोबत मिळून काम करणार आहेत.

साई हॉस्पिटलमध्ये संशयितांवर चाचणी करण्यात येणार आहे. तसंच जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यावर उचार करण्यात येणार आहेत. कस्तुरबा रुग्णालयावरचा रुग्णांचा वाढता ताण कमी करण्यासाठी BMC नं हे पाऊल उचललं आहे. तसंच बीएमसी ही सेवा पुरवल्याबद्दल साई हॉस्पिटलला प्रतिमाह ३० लाख रुपये देणार आहे, असं बीएमसीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय.

मोठी बातमी - कोरोना टेस्टिंगसाठी 'फोन बूथ'; कोरोनाला लढा देण्यासाठी मुंबईत अनोखा प्रयोग

दरम्यान धारावीच्या साई हॉस्पिटलसोबतच चेंबूर इथलं साई हॉस्पिटलही बीएमसीला देणार असल्याचं साई हॉस्पिटलचे खालिद शेख यांनी म्हंटलंय. आमच्याकडे सध्या ५१ बेड्स आणि ९ आयसीयू बेड्स आहेत. बीएमसीला धारावीजवळ अशा प्रकारची सुविधा पुरवणारं हॉस्पिटल हवं होतं त्यामुळे आम्ही बीएमसीला संपूर्ण हॉस्पिटल देण्याचा निर्णय घेतला असंही शेख यांनी म्हंटलंय.  

तसंच बीएमसीनं धारावीजवळच्या जिल्हा क्रीडा केंदातही विलगीकरण कक्ष बनवण्याचंस निश्चित केलं आहे. जिल्हा क्रीडा केंद्रात बीएमसीनं तब्बल ३०० बेड्स सज्ज केले आहेत. ज्यामुळे कोरोनाग्रस्तांना तातडीनं मदत आणि उपचार मिळणार आहे.

fight against covid 19 special dedicated hospital for corona positive patients of dharavi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fight against covid 19 special dedicated hospital for corona positive patients of dharavi