esakal | तारापूर स्फोटातील कारखाना मालकांवर गुन्हे दाखल करा : खासदार राजेंद्र गावित
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

तारापूर स्फोटातील कारखाना मालकांवर गुन्हे दाखल करा : खासदार राजेंद्र गावित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पालघर : तारापूर (Tarapur) औद्योगिक परिसरातील कंपनीत (Company) झालेल्या स्फोटात दोन कामगारांचा बळी (Death)गेला व पाच कामगार जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी दोषी असणाऱ्या कंपनीमालकावर गुन्हा दाखल करून कारवाई करा, अशा सूचना खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

हेही वाचा: खराब रस्त्यांमुळे अपघात झाला तर चालक दोषी नाही - न्यायालय

खासदार गावित यांनी अपघात झालेल्या कारखान्याला भेट देत पाहणी केली. या प्रसंगी शिवसेनेचे पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख वैभव संख्ये, उपतालुकाप्रमुख गिरीश राऊत उपस्थित होते. खासदार गावित यांनी जखमी कामगारांची भेट घेत त्यांना दिलासा दिला.

loading image
go to top