अंतिम वर्षाचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत; पुढील शिक्षणासाठी व नोकरीसाठी अडचणी

तेजस वाघमारे
Saturday, 21 November 2020

विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी व नोकरीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे तातडीने गुणपत्रिका द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे. 

मुंबई : कोरोनामुळे एप्रिल-मेमध्ये होणारी अंतिम वर्षाची परीक्षा सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये ऑनलाईन घेण्यात आली. मुंबई विद्यापीठाने या परीक्षांचा निकालही तातडीने लावला; मात्र अद्यापही विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी व नोकरीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे तातडीने गुणपत्रिका द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे. 

हेही वाचा - भिवंडीतील सवाद येथे सुसज्ज कोव्हिड रुग्णालय; पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी 

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात कोरोनामुळे झालेल्या गदारोळानंतर अखेर राज्य सरकारने यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत सप्टेंबर-ऑक्‍टोबर 2020 मध्ये परीक्षा घेतल्या. कोरोनामुळे एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या परीक्षा यंदा विलंबाने घेण्यात आल्या. परीक्षा विलंबाने झाल्या असल्या तरी परीक्षांचे निकाल विद्यापीठाकडून तातडीने लावण्यात आले; मात्र विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका दिली नाही.

हेही वाचा - कॉमेडी क्वीन भारती सिंगला चार तासांच्या चौकशीनंतर NCBकडून अटक

गुणपत्रिका नसल्याने पुढील शिक्षण अथवा नोकरीसाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तातडीने गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत व राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे पत्राद्वारे केली आहे. 

Final year student waiting for a mark sheet Difficulties for further education and job

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Final year student waiting for a mark sheet Difficulties for further education and job