esakal | अखेर दोन वर्षांनतर विवाहित जोडप्यांना सरकारी योजनेचा लाभ; समाजकल्याण विभागाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर दोन वर्षांनतर विवाहित जोडप्यांना सरकारी योजनेचा लाभ; समाजकल्याण विभागाची माहिती

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आंतरजातीय विवाहीत जोडप्यांस प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.

अखेर दोन वर्षांनतर विवाहित जोडप्यांना सरकारी योजनेचा लाभ; समाजकल्याण विभागाची माहिती

sakal_logo
By
राहुल क्षीरसागर

ठाणे : आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आंतरजातीय विवाहीत जोडप्यांस प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र, मागील दोन वर्षापासून अंतरजातीय विवाहीत जोडप्यांना देण्यात येणार्याय अनुदानाची रक्कम शासनाकडून प्राप्त न झाल्याने लाभार्थ्यांना वंचित राहावे लागले होते. मात्र, मागील महिन्यात केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्याने सप्टेंबर 2019 पर्यंतच्या 280 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली.

कौतुकास्पद! कोरोनाकाळात 1 हजार 600 कर्करूग्णांवर टाटा रुग्णालयात शस्त्रक्रिया; उपचाराचा वेग वाढवला

     जातीयवादाची दरी कमी करण्यासाठी राज्य शासनाने ऑगस्ट 2004 मध्ये आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरु केली. देण्यात येणार्या रकमेपैकी आर्धी रक्कम विवाहितांच्या नावाने अल्पबचतीत गुंतविण्यात येत होती. तर उर्वरित रकमेचे संसार उपयोगी साहित्य दिले जात होते. वाढती महागाई आणि बदलत्या काळानुसार पंधरा हजार रुपयांची रक्कम अत्यंत कमी असल्याने यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा हजार रुपयांवरुन ही रक्कम पन्नास हजार करण्यात आली आहे. अस्पृश्यता निवारण्याचा योजनेचा एका भाग म्हणून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थीक सहाय्य देण्याची योजनाशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. दरम्यान, अंतरजातीय विवाह योजना ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने देखील प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

एप्रिल 2015 ते मार्च 2016 या कालवधीत अंतरजातीय विवाह योजने अंतर्गत तब्बल 192 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी 190 लाभार्थाना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये 21 लाभार्थाना 15 हजार रुपयाप्रमाणे तर, 169 लाभार्थाना 50 हजार रुपया प्रमाणे अनुदानाचे वाटप करण्यात आले होते. एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालवधीत अंतरजातीय विवाह योजने अंतर्गत तब्बल 137 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्या सर्वाना अनुदानाचे वाटप करण्यात आले. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालवधीत तब्बल 211 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी 205 लाभार्थ्यांना 50 हजार रुपयाप्रमाणे तर, 6 लाभार्थ्यांना 15 हजार रुपयाप्रमाणे अनुदानाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण विभगाच्या वतीने देण्यात आली आहे.

मुंबईत आठवडाभरातील संपर्कांचा शोध; दररोज 14 ते 15 हजार अतिजोखमीच्या व्यक्तींची नोंद

      दरम्यान, सन 2018 -19 मध्ये 175 प्रस्ताव प्राप्त झाले होते. तर, 2019-20 या चालु वर्षा करीता 153 प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे प्राप्त झाले आहे. मात्र, मागील दोन वर्षापासून अंतरजातीय विवाहीत जोडप्यांना देण्यात येणार्याय अनुदानासाठी राज्य शासनाकडून 50 लाखांचे उदान प्राप्त झाले आहे. मात्र. केंद्र शासनाचा 50 टक्के हिस्सा केंद्र शासनाकडून प्राप्त न झाल्याने मागील दोन वर्षापासून जिल्ह्यातील 328 लाभार्थ्यांना लाभापासून वंचित रहावे लागले होते. त्यात नुकतेच केंद्र शासनाकडून 50 टक्के हिस्सा प्राप्त झाल्यामुळे सन एप्रिल 2018 ते मार्च 2019 मधील 170 लाभार्थ्यांना तर, एप्रिल 2019 ते मार्च 20 मधील 110 अशा एकूण 280 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी समाज कल्याण अधिकारी रमेश अवचार यांनी दिली.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top