मुंबईत आठवडाभरातील संपर्कांचा शोध; दररोज 14 ते 15 हजार अतिजोखमीच्या व्यक्तींची नोंद

मुंबईत आठवडाभरातील संपर्कांचा शोध; दररोज 14 ते 15 हजार अतिजोखमीच्या व्यक्तींची नोंद


मुंबई : मुंबईत कोरोना रुग्ण आढळल्यावर त्यांच्या कुटुंबियांनाच होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. त्याच बरोबर आता सात ते आठ दिवसांचा संपर्क शोधण्यास काही विभागात महापालिकेने सुरुवात केली आहे.

सध्या मुंबईत दररोज 14 ते 15 हजार अतिजोखमीच्या व्यक्तींची नोंद केली जात असून नव्या पध्दतीमुळे ही संख्याही वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठ दिवसांत 1 लाख 28 हजाराहून अधिक अति जोखमीचे संपर्क शोधण्यात आले.
एका रुग्णामागे सरासरी 15 अतिजोखमीच्या व्यक्ती नोंदवल्या जात आहेत. या  व्यक्तींवरही महापालिका लक्ष ठेवत आहेत. यात प्रामुख्याने रुग्णाच्या घरातील आणि शेजारील व्यक्तीचा समावेश असतो. त्याच बरोबर संबंधित व्यक्ती आठवडा भरात ज्या व्यक्तींच्या संपर्कात आली आहे, त्यांचाही शोध घेण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे.

मागील आठ दिवसांत सुमारे 1 लाख 28 हजाराहून अधिक अतिजोखमीचे संपर्क शोधण्यात आले आहेत. तर 15 ते 24 सप्टेंबर या दहा दिवसाच्या काळात ही संख्या दीड लाखाच्यापुढे आहे.

मागिल आठ दिवसातील अतिजोखमीच्या व्यक्ती 
तारीख
-     अतिजोखमीच्या व्यक्ती 
18  सप्टेंबर ------ 20,751

19सप्टेंबर ---- 17336

21 सप्टेंबर ----- 17890

22 सप्टेंबर ---- 13,966

23 सप्टेंबर ---10,938

24 सप्टेंबर --14,749

25 सप्टेंबर ---14,993 

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com