कोरोनाविरुद्धच्या लढ्याला या दानशुरांकडून मदतीचा हात

विक्रमगड ः मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ११ हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार श्रीधर गालीपेल्ली यांना देताना विनायक शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश विनायक पडवळे. (छायाचित्र ः अमोल सांबरे)
विक्रमगड ः मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ११ हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार श्रीधर गालीपेल्ली यांना देताना विनायक शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश विनायक पडवळे. (छायाचित्र ः अमोल सांबरे)

पालघर/बोईसर/कासा (बातमीदार) : कोरोना विषाणू म्हणजेच कोविड-१९ आजाराशी लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. सरकारसोबतच अनेक सामाजिक संस्था, उद्योक क्षेत्रातील कंपन्या, अभिनेते यांच्याकडून मदतीचा हात पुढे येत आहे. या मदतीमुळे कोरोनाविरुद्धच्या संघर्षाला नक्कीच आर्थिक पाठबळ मिळाले आहे.

‘टिमा’तर्फे १.८० कोटी
बोईसर: तारापूर एमआयडीसीतील कारखानदारांची संघटना ‘टिमा’च्या वतीने राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी ८० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तारापूर एमआयडीसीमध्ये १५०० च्या आसपास विविध उत्पादन करणाऱ्या कारखानदारांच्या ‘टिमा’ संघटनेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही जमा रक्कम थेट मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यात जमा होत असून, अजूनही लहान-मोठ्या उद्योजकांकडून उर्वरित आर्थिक मदत मिळाल्यानंतर ती मदत दिली जाईल.

रुपेश विनायक पडवळे यांचे सामाजिक भान
विक्रमगड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि विनायक शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश विनायक पडवळे यांनीही सामाजिक दायित्व म्हणून कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ११ हजार रुपयांची मदत दिली आहे. मदतीच्या रकमेचा धनादेश त्यांनी नुकताच तहसीलदार श्रीधर गालीपेल्ली यांच्याकडे सुपूर्द केला.

सतीश मेहेर यांच्यातर्फे १.११ लाखांची मदत
कासा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशाला सध्या मदतीसाठी सर्वांनी एकसंध होण्याची गरज आहे. देश सध्या मोठ्या अग्नीदिव्यातून जात आहे. पंतप्रधान कार्यालयातून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद देत कासा येथील तवा गावचे सामाजिक कार्यकर्ते सतीश भालचंद्र मेहेर यांनी पंतप्रधान रिलिफ फंडासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून एक लाख ११ हजार रुपयांचा धनादेश पाठवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com