मुंबईकडे पुन्हा पावसाची पाठ, जाणून घ्या पावसासंदर्भातले अपडेट्स

समीर सुर्वे
Monday, 14 September 2020

शनिवारपासून मुंबईत अधून मधून पावासाचा शिडकाव झाल्याने उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र,पुन्हा पाऊस दडी मारणार असून गुरुवारपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई  वेधशाळेने व्यक्त केला आहे.

मुंबई: शनिवारपासून मुंबईत अधून मधून पावासाचा शिडकाव झाल्याने उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र,पुन्हा पाऊस दडी मारणार असून गुरुवारपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई  वेधशाळेने व्यक्त केला आहे.

पालघरमध्ये सोमवारी पाऊस राहणार असून एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पालघरसह ठाण्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे.तर रायगड रत्नागिरीमध्ये मंगळवारपासून जोरदार पावसाची शक्यता आहे.

अधिक वाचाः  मुंबईकर काळजी घ्या, मुंबईतल्या 'या' भागात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय

मुंबईत रविवारी सकाळी काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.तर काही भागात पावसाचा शिडकाव झाला.चेंबूर येथे सर्वाधिक 37.2 आणि सांताक्रुझ येथे 36.4 मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी झालेल्या पावसामुळे मुंबईत काहीसा गारवा निर्माण झाला होता. कुलाबा येथे रविवारी कमाल 32.2 आणि किमान 25 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझ येथे कमाल 31.7 आणि किमान 25 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सोमावरीही तापमान याच पातळीवर राहाणार असून गुरुवारपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यताा आहे.

हेही वाचाः  मुंबईत परतलो, पण जेवणाचे काय? अनलॉकमुळे परतलेल्या कष्टकऱ्यांची परिस्थिती बिकट

शनिवारीही झालेल्या हलक्या पावसामुळे मुंबईला काहीसा दिलासा मिळाला. संध्याकाळपर्यंत तापमानात ३ अंशांची घट नोंदवण्यात आली होती. गेल्या आठवड्यात मुंबईत पावसानं ओढ दिली होती. त्यामुळे कमाल तसेच किमान तापमानातही वाढ झाल्यानं प्रचंड उकाडा जाणवत होता. 

------------

(संपादनः पूजा विचारे)

Find out about rain updates of mumbai thane palghar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Find out about rain updates of mumbai thane palghar