केतकी चितळेची नवबौद्धांसंदर्भात वादग्रस्ट फेसबुक पोस्ट; मुंबईत गुन्हा दाखल

केतकी चितळेची नवबौद्धांसंदर्भात वादग्रस्ट फेसबुक पोस्ट; मुंबईत गुन्हा दाखल

मुंबई: आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया योग्य माध्यम. जवळजवळ सर्व अभिनेते अभिनेत्री सोशल मीडियावर आपले विचार मांडत असतात, व्यक्त होत असतात. या माध्यमातून अनेक कलाकार ट्रोल देखील होतात. मात्र अभिनेत्री केतकी चितळेला आपली फेसबुक पोस्ट चांगलीच महागात पडलीये. फेसबूकवर बहुजन समाजाबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेवर काही आंबेडकरवादी नेत्यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे केतकी चांगलीच संकटात सापडली आहे. 

नक्की काय होती पोस्ट? 

"नवबौद्ध ६ डिसेंबरला मुंबईत फुकट दर्शनासाठी येतात, तो त्यांच्या धर्म विकासासाठीचा हक्क असतो. मात्र आम्ही फक्त 'हिंदू' असं शब्द उद्गारला तर आम्ही घोर पापी आणि कट्टरवादी? पण अर्थात चूक कोणाचीच नाही तर आमचीच आहे आम्ही स्वतःच्यातच भांडणात इतके बिझी आहोत की आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडूही देतो. स्वतःचा धर्म आम्ही विसरतो," अशी पोस्ट केतकी चितळे हीनं लिहिली आहे.   

तिच्या या पोस्टमुळे केतकी चांगलीच ट्रोल देखील झाली. मात्र बौद्ध धर्माबद्दल लिहिलेल्या काही वाक्यांमुळे आंबेडकरवादी संघटनेचे काही नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

काय म्हणाले आंबेडकरवादी नेते: 

"६ डिसेंबरला बौद्ध समाज फुकट मुंबई दर्शनासाठी येतो या वाक्यावरून हा समाज फुकटा आहे असं लक्षात येतं. तसंच महामानवाचा आम्ही आदर करत नाही असं देखील यातून स्पष्ट होतं. नवबौद्ध समाजाबद्दल त्यांच्या मनात द्वेष आहे हे स्पष्ट होत आहे. आम्ही त्यांच्या या विधानांचा निषेध करतो. त्यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी करतो" असं आंबेडकरवादी नेत्यांनी म्हंटलंय.    

'केतकी चितळे'विरोधात भांडुपच्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे केतकी चांगलीच अडचणीत सापडली आहे. .

 FIR against actress ketaki chitale for posting controversial comments  on facebook 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com