PM Narendra Modi | मुंबई: मोदींच्या दौऱ्याच्या मार्गावर सापडला ड्रोन; गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

मुंबई: मोदींच्या दौऱ्याच्या मार्गावर सापडला ड्रोन; गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये होते. त्यांच्या या दौऱ्याच्या फक्त एकच दिवस आधी सुरक्षा यंत्रणांना मुंबईतल्या पेडर रोड परिसरात एक ड्रोन आढळून आला. त्यानंतर आता या घटनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Drone Spotted on Peddar road before PM Modi's Mumbai Visit)

हेही वाचा: भारतीय स्वातंत्र्य लढ्यानं अनेक देशांनां प्रेरणा दिली - PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जून रोजी पेडर रोडमार्गे बीकेसीला जाणार होते. त्यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी हा सगळा रस्ता सुरक्षेच्या कारणास्तव तपासला गेला. यावेळी एका स्थानिकाने माहिती दिली की, त्याला पेडर रोडवर एक ड्रोन (Drone Camera) दिसला. यानंतर पोलिसांनी तपास केला असता त्यांना आढळून आलं की, या परिसरात एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं. त्यावेळी प्लॉट मॅपिंग आणि जाहिरातीसाठी बिल्डर ड्रोनचा वापर करत होता.

हेही वाचा: भारतीय वृत्तपत्रांचं स्वातंत्र्याच्या आंदोलनात मोठं योगदान : मोदी

मात्र, नियमानुसार ड्रोन उडवण्याआधी पोलिसांना माहिती देणं आवश्यक असतं, त्यानंतर एक पोलीस घटनास्थळी देखरेखीसाठी उपस्थित राहतो. मात्र, या बिल्डरने पोलिसांना कोणतीही माहिती दिलेली नसल्याने त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Fir Filed For Flying Drone Ahead Of Pm Modis Visit To Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top