अरे बापरे..! राज्यात कोरोनाचा धोका वाढणार ? गुजरात, राजस्थानातून महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतूक...

illegal transport
illegal transport

मुंबई :  सार्वजनिक वाहतूक करतांना प्रवाशांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जाणार नाही. किंवा प्रवासादरम्यान कोरोनाची बाधा टाळण्यासाठी राज्यातील प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामूळे राज्यातील खासगी वाहकदारांनी आपली वाहने उभे करून ठेवले आहे. मात्र, याचा फायदा गुजरात, राजस्थान येथील खासगी वाहतूकदार घेत असून, गेल्या अनेक दिवसांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारावर मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे प्रवासी वाहतूक करतांना दिसून आले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद आहे. तरीसुद्धा छुप्यामार्गांने गेल्या अनेक दिवसांपासून गुजरात, राजस्थानातून महाराष्ट्रात अवैध खासगी प्रवासी वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आले आहे. मुंबईतील खासगी प्रवासी वाहतूकदारांनी शुक्रवारी राज्याला जोडणाऱ्या टोलनाक्यांवरच या गाड्या पकडल्याने राज्य परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

शुक्रवारी मुंबईतील खासगी वाहतूकदारांनीच सापळा रचून परराज्यातील अनेक खासगी वाहतूकदारांना पकडले असून या वाहनांमध्ये नियमांपेक्षा अधिक प्रवासी आढळून आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचेही कोणतेही नियम पाळण्यात आले नसून याकडे राज्यातील राज्य परिवहन विभागाचे मात्र हेतुपूरस्पर दुर्लक्ष असल्याचा आरोप मुंबईतील खासगी प्रवासी वाहतुकदारांनी केला आहे.

आरोग्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली! खासगी रुग्णालयांची लुटमार सुरूच

गुजरातमधून सर्वाधिक वाहने
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या बघता राज्यातंर्गत आणि देशांतर्गत प्रवासी वाहतूक संध्या बंद आहे. मात्र, याचा फायदा घेत गुजरातमधून छुप्या मार्गांने गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी गुजरातमधून खासगी प्रवासी वाहने सुरू आहे. 

मोठी बातमी - मातेच्या गर्भातच बाळांना कोरोनाची लागण, मुंबईत जन्मताच तीन बालके कोरोना पॉझिटिव्ह​

राज्याच्या सीमेवर तपासणीच नाही
राज्य परिवहन विभागाच्या राज्याच्या आणि मुंबईत प्रवेश करणाऱ्या सीमेवर तगडा बंदोबस्त आहे. मात्र, तरीही गुजरात आणि राजस्थान राज्यातील खासगी प्रवासी वाहतूकीची वाहनांना मुंबईसह राज्यात प्रवास कसा दिला जातो ? असा प्रश्न मुंबईतील खासगी प्रवासी वाहतूकदारांनी उपस्थित केला आहे.

कोरोनामुळे धारावी झाली 'बदनाम वस्ती', आता इथल्या नागरिकांना सहन करावा लायतोय 'हा' त्रास...

मनमानी भाडेवसूली
परराज्यातून मुंबईत सोडणाऱ्या प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूली केली जात आहे. मुंबईच्या सीमेवर पकडण्यात आलेल्या खासगी वाहनातील एका प्रवाशाजवळ प्रवास भाड्याची पावती बघितल्यानंतर एका प्रवाशांकडून तब्बल 6000 रूपये भाडेवसूली केली जात असल्याचे उघड झाले आहे.


राज्यातील बस मालकांनी गेल्या तीन महिन्यांपासून प्रवासी वाहतूक बंद केली आहे. मात्र, परराज्यातील बस वाहतूकदार सर्रास विनापरवानगी, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करत आहे. या प्रवाशांची कोणत्याही प्रकारची आरोग्य तपासणी सुद्धा नाही. त्यामुळे गुजरात, राजस्थानातून महाराष्ट्रात छुप्या मार्गांने येणाऱ्या प्रवाशामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील खासगी वाहतूकदारांचा व्यवसाय बंद पाडून इतर राज्यातील खासगी वाहतूकदारांना मात्र प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली जात आहे.
- हर्ष कोटक, सरचिटणीस, मुंबई बस मालक संघंटना


राज्य परिवहन विभागाचा कोणावरही आशीर्वाद नाही. शुक्रवार पासूनच राज्यभर अशाप्रकारच्या अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई सुरू केली आहे. यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. संचारबंदी आणि जिल्हाबंदी असतांना कोणत्याही प्रवासी वाहतूकीला परवानगी नाही.
- अभय देशपांडे, प्रवक्ते, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com