सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : सुशांतसोबतचे कॉन्ट्रॅक्ट यश राज फिल्म्सने पोलिसांकडे केले सुपूर्त... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sushant and yrf

यश राज फिल्मला सुशांत सोबतचे कॉन्ट्रॅक्ट सादर करण्यास पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार त्याची प्रत शनिवारी तपास अधिकाऱ्याला सुपूर्त करण्यात आली आहे. त्याची तपासणी सुरू आहे. गरज पडल्यास या संबंधीत व्यक्तींचीही चौकशी करण्यात येणार आहे.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : सुशांतसोबतचे कॉन्ट्रॅक्ट यश राज फिल्म्सने पोलिसांकडे केले सुपूर्त...

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी वांद्रे पोलिस तपास करत आहे. परवा सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची तब्बल 10 तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली. तसेच पोलिसांनी सुशांतच्या घरातून पाच डायऱ्याही जप्त केल्या असून काही निकटच्या व्यक्तींचाही पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर आज बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माती कंपनी यश राज फिल्मने सुशांत सिंग राजपुत सोबत केलेल्या कॉन्ट्रॅक्टची प्रत पोलिसांना सुपूर्त केली आहे. याप्रकरणी शनिवारी सुशांतसोबत काम करणाऱ्या व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले.

कोरोनाविरोधात लढा तीव्र! फळ, भाजी विक्रेत्यांचीही तपासणी होणार

यश राज फिल्मला सुशांत सोबतचे कॉन्ट्रॅक्ट सादर करण्यास पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार त्याची प्रत शनिवारी तपास अधिकाऱ्याला सुपूर्त करण्यात आली आहे. त्याची तपासणी सुरू आहे. गरज पडल्यास या संबंधीत व्यक्तींचीही चौकशी करण्यात येणार आहे. सुशांत सिंगच्या आत्महत्येप्रकरणी गटबाजी कारण असल्याचा आरोप नुकताच अनेक कलाकारांनी केला होता. त्या अनुषंगाने तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी उचललेले हे पाऊल म्हणता येईल. 

मोठी बातमी - २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसैन राणा याला अमेरिकेत अटक...​

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी याप्रकरणी रिया चक्रवर्तीसोबत पब्लिक रिलेशन मॅनेजर आणि सुशांतचा व्यावसायिक मॅनेजर यांचा जबाब नोंदवला. या दोघांच्याही जबाबात काही विशेष माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रियाकडून सुशांतबद्दल सविस्तर माहिती घेण्यात आली आहे. पोलिसांनी सुशांतचे वडील आणि दोन बहिणी, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा, नोकर अशा 15 जणांचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच डायऱ्याही हस्तगत केल्या असून त्यांची तपासणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवार, शनिवारीही याप्रकरणी व्यवस्थापकीय कर्मचा-यांकडून सुशांत बाबतची अधिक माहिती घेण्यात आली.

मोठी बातमी - मातेच्या गर्भातच बाळांना कोरोनाची लागण, मुंबईत जन्मताच तीन बालके कोरोना पॉझिटिव्ह​

या आत्महत्येप्रकरणी आता बॉलिवूडमधील दोन मोठ्या अभिनेत्यासह एका अभिनेत्रीचा जाब नोंदवण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणातील चौकशीसाठी 3 विशेष टीम तयार करण्यात आल्या आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध् चेहरे समोर येऊन बोलू लागले आहेत. अशातच सोनू निगम यानेही एक खळबळजनक दावा केला आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील एका बड्या कंपनीमुळे अनेक गायक आत्महत्येचा पर्याय स्वीकारू शकतात, असे सोनू निगमने म्हटले आहे.

टॅग्स :Leo Horoscope