233 कोटींच्या बनावट कंपन्यांच्या पावत्यांद्वारे जीएसटी गैरव्यवहार; दोघांना अटक

233 कोटींच्या जीएसटी गैरव्यवहारप्रकरणी दोघांना अटक; बनावट कंपन्यांद्वारे पावत्यांचे वितरण
233 कोटींच्या जीएसटी गैरव्यवहारप्रकरणी दोघांना अटक; बनावट कंपन्यांद्वारे पावत्यांचे वितरण

मुंबई : बनावट कंपन्यांद्वारे बोगस पावत्या वितरीत करून सुमारे 14 कोटी रुपयांचे जीएसटी नुकसान केल्याप्रकरणी वस्तू व सेवा कर विभागाने (जीएसटी) दोन कंपनीमालकांना अटक केली आहे. आरोपींनी दोन बनावट कंपन्यांच्या माध्यमातून बोगस पावत्या वितरीत करून 233 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.

हनीफ मोहम्मद नागरिया व फैजल मोहम्मद हनीफ नागरिया अशी अटक दोन व्यावसायिकांची नावे आहेत. बोगस विक्री पावत्या तयार केल्याप्रकरणी नेहा इम्पेक्स व रोहिनी इम्पेक्स या दोन कंपन्या जीएसटी विभागाच्या रडावर होत्या. त्या वेळी तपासणी केली असता दोन्ही कंपन्या डमी व्यक्तींच्या नावावर उभारण्यात आल्या आहेत. तसेच त्यासाठी बोगस कागदपत्रांचाही वापर केल्याचे जीएसटी विभागाच्या तपासात निष्पन्न झाले. या कंपनीच्या माध्यमातून आरोपी हनीफ नागरियाच्या व फैजल नागरिया यांच्या अधिपथ्याखाली असलेल्या नऊ कंपन्यांना माल अथवा सेवा पुरवल्याच्या बोगस पावत्या दिल्याचे निष्पन्न झाले. मुळात अशा कोणत्याही वस्तू अथवा सेवा पुरवण्यात आल्या नव्हत्या. केवळ कागदोपत्री व्यवहार दाखवले होते. 

त्यानंतर नऊ बनावट कंपन्यांच्या माध्यमातून कपड्याची निर्यात झाल्याचे दाखवून कर परतावा मागण्यात आला. डमी व्यक्तीच्या नावे उभारण्यात आलेल्या या दोन कंपन्यांच्या नावावर 233 कोटी 21 लाख रुपयांच्या विक्री पावत्या वितरीत केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या माध्यमातून निर्यात दाखवून 13 कोटी 82 लाख रुपयांचा कर गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सबळ पुरावे प्राप्त झाल्यानंतर हनीफ व फैजल या दोघांना नुकतीच जीएसटी विभागाने अटक केली. न्यायालयाने 10 डिसेंबरपर्यंत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com