नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी विरारच्या जीवदानी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी विरारच्या जीवदानी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी

मुंबईः विरारची जीवदानी देवी लाखो भाविकांचे श्रद्धाथान आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज सकाळी 5 वाजल्यापासून हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. 2020 वर्षात कोरोना महामारीने प्रत्येक नागरिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागला. पण 2021 या हे वर्षे कोरोना मुक्त होऊन, प्रत्येकजण निरोगी आणि सुख समृद्ध व्हावे असे भाविकांनी जीवदानी देवीला साकडे घातल्याचे पाहायला मिळाले आहे. 

संपूर्ण पालघर जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, रायगडसह महाराष्ट्र, गुजरात परिसरातील भाविक भक्तांचे विरारची जीवदानी देवी श्रद्धास्थान आहे. आज 2021 या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नवी आशा, नवे संकल्प, नव्या आकांक्षा घेऊन हजारो भाविकांनी जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आज पहाटे 5 वाजल्यापासूनच रांगा लागल्या होत्या. दररोज सकाळी 6 वाजता उघडणारे मंदिर आज मात्र अर्धातास अगोदरच मंदिर ट्रस्टीला दर्शनासाठी सुरु करावे लागले आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर ट्रस्टीने सकाळ पासूनच सुरक्षा गार्ड, सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स पाळल्या जाव्यात यासाठी सतर्कता बाळगली आहे. स्वत: मंदिर ट्रस्टी प्रदीप तेंडुलकर  मंदिराच्या गाभाऱ्यात थांबुन भाविकांना सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.  

आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. पण या गर्दीत सरकारच्या नियमांचे कुठेही उल्लंघन होऊ नये यासाठी आम्ही मंदिर व्यवस्थापनाने सर्व व्यवस्था केली आहे. 120 सुरक्षा गार्ड जागोजागी लावले आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात सोशल डिस्टन्स पाळल्या जावे यासाठी आमचा प्रत्येक कर्मचारी सतर्क ठेवला आहे. त्यामुळे भाविकांचे अतिशय शांततेत दर्शन होत असल्याचे जीवदानी देवी संस्थानचे विश्वस्त प्रदीप तेंडुलकर यांनी सांगितले आहे.

2020 या वर्षात इतिहासात पहिल्यांदा 8 महिने देशातील सर्वच देवस्थान बंद होते. या वर्षाने प्रत्येक नागरिकांना बरेच काही शिकविले आहे, अनेक संकटांना सामना करावा लागला आहे. हे नवीन वर्षे कोरोनामुक्त व्हावे आणि प्रत्येक नागरिकांना निरोगी, सुख, समृद्ध आणि भरभराटीचे जावो हे साकडं जीवदानी देवीला वर्षाच्या पहिल्याच दिवशी घातलं असल्याची प्रतिक्रिया बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी  दिल्या आहेत. पाटील हे आपल्या कुटुंबियांसह आज सकाळीच जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी 'सकाळ' शी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

First day new year thousands of devotees Jeevdani temple in Virar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com