पाकिस्तानी एजंटचा ई-मेल, ७ जण भारतात करणार दहशतवादी हल्ला...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

मुंबई : भारतावर दहशतवादी हल्ला होणार असे खोटे मेल किंवा फोन येणं मुंबई पोलिसांसाठी काही नवीन नाही. मुंबई पोलिस या प्रत्येक कॉल आणि मेलची शहानिशा नेहमीच करत असतात. असाच एक मेल काही दिवसांपूर्वी मानखुर्द पोलिस स्टेशनमध्ये आला होता याचा आता पोलिसांनी छडा लावलाय. 

मुंबई : भारतावर दहशतवादी हल्ला होणार असे खोटे मेल किंवा फोन येणं मुंबई पोलिसांसाठी काही नवीन नाही. मुंबई पोलिस या प्रत्येक कॉल आणि मेलची शहानिशा नेहमीच करत असतात. असाच एक मेल काही दिवसांपूर्वी मानखुर्द पोलिस स्टेशनमध्ये आला होता याचा आता पोलिसांनी छडा लावलाय. 

७ भारतीय नागरिक दुबईच्या मार्गे पाकिस्तानला दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार आहेत आणि दहशतवादी कृत्य करण्यासाठी पुन्हा भारतात येणार आहेत, असा मेल मानखुर्द पोलिस स्टेशनला आला होता. त्यावर पोलिसांनी मेल पाठवणाऱ्या शोध घ्यायला सुरुवात केली होती. तब्बल २ दिवस तपास केल्यानंतर पोलिसांना या मेल मागच्या खऱ्या सूत्रधाराचा छडा लावला आहे. एका एजंटनं सात जणांना अमेरिकेत बेकायदेशीर रित्या पाठवण्यासाठी आणि लाखो रुपये उकळण्यासाठी  हे कारस्थान केलं असल्याचं उघड झालं आहे.    

मोठी बातमी -  'माझ्या अमूल ताकत बुरशी', टिटवाळ्याच्या ग्राहकाची तक्रार...

नक्की काय घडलं :

मानखुर्द पोलिस ठाण्याच्या इमेल आयडीवर २० फेब्रुवारीला एक मेल आला होता. यामध्ये सात जण भारतातून दुबईमार्गे पाकिस्तानात जाणार आहेत असं लिहिण्यात आलं होतं. या ७ जणांना दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण देऊन पुन्हा भारतात पाठवलं जाणार असल्याचं या मेलमध्ये म्हंटलं होतं. ७ जणांची ही टोळी दोन टप्प्यांमध्ये पाकिस्तानात जाणार आणि यातले चार जण २३ फेब्रुवारीला निघणार आहेत असंही या मेलमध्ये लिहिण्यात आलं आहे. या मेलमध्ये या सात जणांचं ना, मोबाईल क्रमांक, पासपोर्टची माहिती देण्यात आली होती.

मोठी बातमी -  चंद्रकांत पाटील यांच्या 'पीएचडी'वर; शरद पवारांचं जबरदस्त उत्तर..

गुन्हे शाखेच्या पथकांनी या सातपैकी सहा जणांना शोधून काढलं. यामध्ये महिलांचाही समावेश होता. यापैकी काही जणांकडे दुबईचे तिकीट व्हिसा तसंच कॅनडाचाही व्हिसा असल्याचं उघड झालं होतं. मात्र पोलिसांच्या चौकशीत हे सर्वजण दुबईमार्गे पाकिस्तानात नाही तर कॅनडामार्गे अमेरिकेत जाणार असल्याचं उघड झालं आहे. हे ७ जण अमेरिकेत बेकायदेशीररित्या घुसणार होते. म्हणूनच एजंटकडून त्यांनी अमेरिकेत घुसखोरी करण्याचं ठरवलं होतं.

एजंट आहे पाकिस्तानी :

या घटनेत पोलिसांची फसवणूक करणारा एजंट हा  मूळचा पाकिस्तानी आहे. ट्रॅव्हल एजंट किरण शौकत अली हा अमेरिकेतल्या ह्युस्टन शहरामध्ये राहतो. अमेरिकेतील अनिवासी भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांनी आपल्या नातेवाईकांना अमेरिकेत आणण्यासाठी अली याच्याशी संपर्क साधला होता.

मोठी बातमी -  कांदा, बटाटा, लसणाच्या दरात मोठी घसरण! वाचा काय आहे भाव?

या सगळ्यांना दुबई, कॅनडा आणि तिथून अमेरिकेत बेकायदा आणण्यासाठी या एजंटनी प्रत्येकी २५ ते ३० हजार डॉलर घेतले होते. घेतलेले पैसे परत करावे लागू नये यासाठी या एजंटनं मुंबई पोलिसांना इमेल पाठवला होता. हे सातजण भारताबाहेर पडण्याच्या आधीच पोलिसांच्या तावडीत सापडले तर त्यांचे पैसे परत द्यावे लागणार नाहीत असा विचार करून या एजंटनं हे केल्याचं उघड झालंय.

त्यामुळे कुठलाही दहशतवादी कट या प्रकरणामागे नाही, हे मुंबई पोलिसांनी तपासादरम्यान उघड केलं आहे.    

seven people will attack india mumbai police gets threatening email


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven people will attack india mumbai police gets threatening email