"डोनाल्ड ट्रंप यांनी शिवभोजन थाळीचा रांगेत उभं राहून आस्वादही घेतला असता"

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे आज भारत दौऱ्यावर आले आहेत. गुजरातच्या अहमदाबाद मधील साबरमती आश्रम आणि नंतर मोटेरा स्टेडियमवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याला सुरवात झालीये. यानंतर डोनाल्ड ट्रम्प आग्रा इथल्या ताजमहालला भेट देणार आहेत. ताजमहालनंतर डोनाल्ड ट्रम्प हे दिल्लीसाठी निघणार आहेत.

मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे आज भारत दौऱ्यावर आले आहेत. गुजरातच्या अहमदाबाद मधील साबरमती आश्रम आणि नंतर मोटेरा स्टेडियमवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याला सुरवात झालीये. यानंतर डोनाल्ड ट्रम्प आग्रा इथल्या ताजमहालला भेट देणार आहेत. ताजमहालनंतर डोनाल्ड ट्रम्प हे दिल्लीसाठी निघणार आहेत.

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप महाराष्ट्रात किंवा मुंबईत येणार नाहीयेत. दरम्यान याच मुद्द्यावरून विविध राजकीय पक्षांकडून ट्रम्प यांच्या दौऱ्यावर टीका देखील करण्यात आली आहे. आता यावरून शिवनसेनेचे राज्यसभेतील खासदार आणि सामानाचे संपादक संजय राऊत यांनी चांगलाच टोला लगावलाय. 

मोठी बातमी - चीनहून परतली, अन् 'कोरोनो' घेऊन आली!'

काय म्हटलंय सामनामध्ये 

"सध्या देशात आणि देशाच्या राजकारणात एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे शिवभोजन थाळीची. संपूर्ण जगाला शिवभोजन थाळीचं आश्चर्य वाटतंय. डोनाल्ड ट्रंप जर मुंबईत आले असते, तर त्यांनीही शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असता. राहुल शेवाळे यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्राची थाळी या कार्यक्रमात रांगेत उभं राहून डोनाल्ड ट्रंप यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शिवथाळीचा आनंद घेतला असता." असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावलाय.

आजच्या सामानाच्या अग्रलेखातून अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावर टीका करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारतात व्य[आरास येणार आहेत. याचा फायदा भारतातील गोरगरीब जनतेला होणार नाही. ट्रम्प यांच्या ३६ तासांच्या दौऱ्यानंतर या मातीत ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या खुणा देखील राहणार नाहीत. ट्रम्प यांच्या भेटीबद्दल देशभरात कमालीची उत्सुकता वगैरे शिगेला पोहोचल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ते काही तितकेसे खरे नाही, असं देखील यामध्ये म्हटलंय. 

मोठी बातमी - आज ठाकरे सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट...

फक्त अहमदाबादच का ?
 
एकीकडे शिवनसेनेनं ट्रंप यांच्या भारतभेटीवर टीका केली असताना आता मनसेही यात मागे राहिली नाहीये. 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात येतात मात्र त्यांना फक्त अहमदाबादमध्येच का नेलं जातं? असा सवाल मनसेकडून विचारण्यात आला आहे. 

mouthpiece of shivsena samana targets donald trumps india visit read full news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mouthpiece of shivsena samana targets donald trumps india visit read full news