अतिरेक करू नका; शिंदेंच्या बंडानंतर ठाण्यातील शिवसेना खासदारांची पहिली प्रतिक्रिया

आम्ही शिवसैनिक आहोत, तेव्हा अतिरेक करू नका; अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेनेचे खासदार राजन विचारे
First reaction of Shiv Sena MP Rajan vichare Thane after eknath Shinde rebellion politics
First reaction of Shiv Sena MP Rajan vichare Thane after eknath Shinde rebellion politics Rajan Vichare

ठाणे : जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर नवनियुक्तांसह खासदार राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी आणि आनंद आश्रमात शक्तिप्रदर्शन केले. आम्ही शिवसैनिक आहोत, तेव्हा अतिरेक करू नका; अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी दिला. फुटीनंतर प्रथमच विचारे यांनी मौन सोडले असून खऱ्या अर्थाने ठाण्यात ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर जिल्ह्यातील अनेक आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मातोश्रीने हकालपट्टीचे अस्त्र उगारले होते. त्यातच रविवारी (ता. ३१ जुलै) शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे व उपनेतेपदी अनिता बिर्जे यांची वर्णी लावण्यात आली. या नियुक्त्यांनंतर सोमवारी (ता. १) विचारे व केदार दिघे समर्थकांनी दिवंगत दिघे यांच्या शक्तिस्थळावर आणि टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात जाऊन त्यांचे दर्शन घेतले. याप्रसंगी अनेक जुन्या शिवसैनिकांसह काही माजी नगरसेवकही उपस्थित असल्याचे दिसून आले.

दिघे यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्ती, त्यांचा खरा वारसदार आज जिल्हाप्रमुख झाला. आकसाने कुणाच्या झुणका-भाकर केंद्रावर कारवाई करू नका. आपापसात काही करायला लावू नका, याच शिवसैनिकांमुळे तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर पोहचलात. बाळासाहेब, आनंद दिघे यांचे नाव घेता तसे काम करा. आम्ही शिवसेनेचे लोक आहोत, अतिरेक करू नका... जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांना आव्हान

शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काकांच्या (स्व. दिघे) बाबतीत खरे काय घडले हे विलंब न लावता सांगा असे आव्हान दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com