esakal | मुंबईकरांनो सावधान ! कशामुळे इतिहासात पहिल्यांदाच मुंबईत धडकतंय चक्रीवादळ ?
sakal

बोलून बातमी शोधा

cyclone

मुंबई पहिल्यांदाच महाभयंकर चक्रीवादळाचा सामना करणार आहे. मात्र हे चक्रीवादळ निर्माण कसं झालं आणि या चक्रीवादळाची तीव्रता काय असणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

मुंबईकरांनो सावधान ! कशामुळे इतिहासात पहिल्यांदाच मुंबईत धडकतंय चक्रीवादळ ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: एकीकडे कोरोनानं मुंबईत हाहाकार माजवला आहे तर आता त्यात भर की काय  म्हणून मुंबईवर अजून एक संकट ओढवणार आहे. निसर्ग नावाच्या चक्रीवादळानं मुंबईकडे कूच केलीये. ३ तारखेला हे चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यांवर धडकणार आहे अशी शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे मुंबई पहिल्यांदाच महाभयंकर चक्रीवादळाचा सामना करणार आहे. मात्र हे चक्रीवादळ निर्माण कसं झालं आणि या चक्रीवादळाची तीव्रता काय असणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

काही दिवसांपूर्वी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांवर अम्फान नामक वादळ धडकलं होतं. या भयंकर चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल राज्यात प्रचंड हानी झाली होती. मात्र आता महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत अशाच प्रकारचं एक चक्रीवादळ धडकतंय. हवामान विभागाच्या माहितीनुसार हे चक्रीवादळ बुधवारी धडकणार आहे. 

हेही वाचा: 'वंदे भारत'मधून भारतात आलेल्या किती जणांना कोरोनाची बाधा?; न्यायालयाची केंद्राला विचारणा

मुंबईत धडकणारं पाहिलंच चक्रीवादळ

या पूर्वी देशात अनेक राज्यांमध्ये चक्रीवादळ येऊन गेलीत. मात्र आर्थिक राजधानी मुंबईच्या इतिहासातील हे पाहिलंच चक्रीवादळ असणार आहे, मुंबई पहिल्यांदाच चक्रीवादळाचा सामना करणार आहे. दरम्यान यावेळी हवेचा वेग ताशी ११५ ते १२५ किमी असण्याची शक्यता आहे. त्यासाठी संपूर्ण मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यांवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांना पुढचे काही तास किनाऱ्यांवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. केमिकल आणि इतर कंपन्यांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. 

हेही वाचा: तरुणांनो काळजी घ्या! कोरोनाचा तुमच्याभोवतीचा फास आवळतोय...

का येणार मुंबईत चक्रीवादळ: 

अरबी समुद्रात अचानक निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर महाभयंकर अशा चक्रीवादळात झालं आहे आणि आता हे चक्रीवादळ मुंबई आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यांवर धडकणार आहे अशी माहिती भारताच्या हवामान विभागानं दिली आहे. त्यात हे मुंबईत येणारं हे पहिलंच चक्रीवादळ असणार आहे त्यामुळे मुंबईकरांना अतिदक्षतेनं आणि हिमतीनं या चक्रीवादळाचा सामना करावा लागणार आहे.     

for the first time cyclone is hitting mumbai why nisarg cyclone coming to mumbai read full story

loading image
go to top