esakal | तरुणांनो काळजी घ्या! कोरोनाचा तुमच्याभोवतीचा फास आवळतोय...
sakal

बोलून बातमी शोधा

youngster.

राज्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आता जवळपास तीन महिने होत आले आहे. देशातील रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे.

तरुणांनो काळजी घ्या! कोरोनाचा तुमच्याभोवतीचा फास आवळतोय...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आता जवळपास तीन महिने होत आले आहे. देशातील रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असला तरी रुग्णांमध्ये तरुणाईचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. 20 ते 40 वयोगटातील तरुणांचा यामध्ये समावेश आहे.राज्यात 48 दिवसांत कोरोनाग्रस्त होण्यात तरुणांची संख्या जवळपास 28 टक्क्यांनी वाढली आहे. 

मोठी बातमी ः निसर्ग चक्रीवादळामुळे पालिकेचे जागते रहो! विभागीय कार्यालयांना सतर्क राहण्याचे आदेश 

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, लॉकडाऊनच्या काळाच कामानिमित्त तरुणाईच सर्वाधिक बाहेर पडत आहेत. आणि त्याच कारणांमुळे ते सर्वात जास्त कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. मेडिकल एज्युकेशन अॅण्ड ड्रग विभाग महाराष्ट्राच्या आकडेवारीनुसार, 14 एप्रिल म्हणजेच लॉकडाऊन 1.0 पर्यंत राज्यात 923 लोक पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर, 31 मेपर्यंत कोरोनानेग्रस्त झालेल्या तरुणांच्या संख्येत वाढ होऊन ती संख्या 26, 325 पर्यंत पोहोचली.

मोठी बातमी ः डॉक्टरसाहेब... माझ्या मुलाला शिंक आली, कोरोना तर नसेल ना?

कोरोनाचा सर्वाधिक धोका हा वृध्द किंवा ज्यांना दीर्घकालीन आजार असणाऱ्यांना आहे, असे आपण समजत होतो. मात्र, आता तरुणाईच कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. म्हणजे फक्त वृद्ध नाही तर तरुणांना काही आधीच वेगळे आजार असतील आणि कोरोना झाला तर ते धोकादायक ठरू शकतं, हे समोर आलं आहे. 

मोठी बातमी ः पावसाळ्यात दहिसरला पूराचा धोका; मेट्रोने अद्याप पूर्ण नाही केले काम

कोरोनाच्या विळख्यात तरुणाई अडकण्याची प्रमुख दोन कारणे आहेत. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहेत. त्यामुळे ते संसर्गात येत आहेत. तर, दुसरं मुख्य कारण म्हणजे अनेक तरुण लॉकडाऊनचे पालन करत नाहीत. कुटुंबातील इतर कोणी बाहेर पडू नये म्हणुन तरूणच घराबाहेर पडत आहेत. 
- डॉ. ओम श्रीवास्तव , संक्रमण रोगाचे विशेषज्ज्ञ 

loading image
go to top