esakal | 'वंदे भारत'मधून भारतात आलेल्या किती जणांना कोरोनाची बाधा?; न्यायालयाची केंद्राला विचारणा
sakal

बोलून बातमी शोधा

vande bharat.

लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या विमान प्रवासात मास्क, फेस शील्डचा वापर व सुरक्षेचे सर्व नियम पाळण्यात येतील, अशी ग्वाही केंद्र सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाला दिली.

'वंदे भारत'मधून भारतात आलेल्या किती जणांना कोरोनाची बाधा?; न्यायालयाची केंद्राला विचारणा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या विमान प्रवासात मास्क, फेस शील्डचा वापर व सुरक्षेचे सर्व नियम पाळण्यात येतील, अशी ग्वाही केंद्र सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाला दिली. वंदे भारत मिशनअंतर्गत विशेष विमानाने भारतात आलेले किती प्रवासी कोरोनाबाधित होते, याचा तपशील सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने केंद्र सरकारला दिले.

मोठी बातमी ः निसर्ग चक्रीवादळामुळे पालिकेचे जागते रहो! विभागीय कार्यालयांना सतर्क राहण्याचे आदेश 

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या परिपत्रकाची माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उच्च न्यायालयाला दिली. कोरोनाचा फैलाव वाढत असतानाही विमानातील मधले आसन रिक्त न ठेवण्याच्या एअर इंडिया व्यवस्थापनाच्या निर्णयाविरोधात वैमानिक देवेन कनानी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

मोठी बातमी ः डॉक्टरसाहेब... माझ्या मुलाला शिंक आली, कोरोना तर नसेल ना?

याबाबत मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्या. एस. जे. काथावाला आणि न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. प्रवाशांसाठी थ्री-प्लाय मास्क, फेस शील्ड पुरवण्यात येणार आहेत. शक्यतो मधले आसन रिक्त ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. अधिक प्रवासी असतील तेव्हा मधल्या आसनावर बसणाऱ्या प्रवाशांना सुरक्षेसाठी गाऊन दिले जातील, असे नागरी हवाई वाहतूक संचालनालय आणि एअर इंडियाच्या वतीने सांगण्यात आले. 

मोठी बातमी ः पावसाळ्यात दहिसरला पूराचा धोका; मेट्रोने अद्याप पूर्ण नाही केले काम

किती प्रवासी कोरोनाबाधित? 
वंदे भारत अभियानंतर्गत भारतात आलेले किती प्रवासी विमानात बसण्याआधी कोरोना निगेटिव्ह होते? भारतात आल्यावर झालेल्या चाचणीत किती प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली. अशा प्रवाशांचा तपशील पुढील सुनावणीला दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने केंद्र सरकारला दिले. याचिकेवर पुढील सुनावणी  4 जूनला होईल.
 

loading image
go to top