मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच! 16 दिवसांत पाच मृत्यू 

अपघात.j
अपघात.j

मनोर ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मागील 16 दिवसांत झालेल्या अपघांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मेंढवन खिंडीत झालेल्या अपघातात शुक्रवारी (ता. 28) 4.30 वाजण्याच्या सुमारास कारचा अपघात झाला होता. या अपघातात आठ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. लोचन पाटील असे मयत मुलाचे नाव असून तो बऱ्हाणपूरचा रहिवासी होता.

पालघर तालुक्‍यातील बऱ्हाणपूर गावातील वासुदेव पाटील आपल्या दोन मुलांसह सासुरवाडीला जात असताना मेंढवण खिंडीत त्यांच्या कारचे स्टेअरिंग लॉक झाले आणि अपघात झाला. या अपघातात कार दुभाजकाला धडकली आणि कारचा दरवाजा उघडून त्यांचा आठ वर्षीय मुलगा लोचन रस्त्यावर पडला होता. यात डोक्‍यावर जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कारचालक वासुदेव पाटील आणि त्यांचा दुसरा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. 


- आठ तासांची हटवली कॉईल 
मुंबई अहमदाबाद महामार्गावर सकवार गावच्या हद्दीत मुंबई वाहिनीवर शनिवारी (ता.29) पहाटे कंटेनरचा अपघात झाला होता. या अपघातात कंटेनर वरील अवजड लोखंडी कॉइल महामार्गाच्या मुंबई वाहिनीवर पडून राहिल्याने एक लेन बंद झाली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.सकवार टोल नाक्‍यापासून मीटरच्या अंतरावर महामार्गावर पडलेली अवजड लोखंडी कॉइल दुपारी दोन वाजता हटविण्यात आली. रस्त्यावर पडलेल्या लोखंडी कॉइलमुळे अपघाताची शक्‍यता असताना महामार्गाच्या ठेकेदार कंपनी कडून कॉइल हटविण्यासाठी आठ तासांचा वेळ लागला.त्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. 

मागील 16 दिवसांत झालेले अपघात 
- 24 ऑगस्टला महामार्गावरील पेल्हार उड्डाणपूलावरील नादुरुस्त ट्रक हटविण्यात दिरंगाई केल्यामुळे ट्रकला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात कोपर गावातील तरुण जागीच ठार झाला होता. 
- 22 ऑगस्ट दुर्वेस वैतरणा नदीच्या कठड्याला धडकून इनोव्हा कारच्या अपघातात नगरसेवकाचा मुलगा ठार झाला होता. 
- 13 ऑगस्ट इको आणि एसटी बसच्या अपघातात आग लागून दोन्ही वाहने जळून खाक झाली होती. तर दोघांचा मृत्यू झाला होता. 
- 12 ऑगस्ट ला सातीवली गावच्या हद्दीत कंटेनरचा अपघात आणि दुसऱ्या अपघातात कार दुभाजकाला धडकून अपघात झाला होता.दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले होते. 
 

(संपादन ः रोशन मोरे)
Five killed in Mumbai-Ahmedabad highway accident in last 16 days

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com