भाजपच्या इशाऱ्याने पालिकेत पाच हजार कोटींच्या सीसी रोडच्या निविदा

शिवसेनेचे पालिकेतील अस्तित्व संपल्याची आपची टीका
Five thousand crores tender road mumbai municipality BJP shiv sena
Five thousand crores tender road mumbai municipality BJP shiv sena esakal

मुंबई : मुंबईतील रस्त्याच्या दुरावस्थेला इतके दिवस उलटल्यानंतर पालिकेला रस्त्याच्या निविदा काढण्यासाठीची जाग आली आहे. मुंबई महानगरपालिकेने एकाच दिवसात सुमारे पाच हजार कोटींची निविदा प्रक्रिया एकाच दिवसात राबवली. इतक्या मोठ्या प्रमाणात निविदा काढण्यासाठी नेमके कोणाच्या सांगण्यावरून पालिकेत कारभार सुरू आहे, असा सवाल आम आदमी पार्टीच्या मुंबईच्या अध्यक्षा प्रीती मेनन शर्मा यांनी केला आहे. मुंबई महापालिकेत एकाचवेळी प्रशासकांच्या अधिकारात इतक्या मोठ्या रकमेची निविदा काढण्यामागे कोणत्या राजकीय पक्षाचे इतके हित जोपासले जात आहे, असा सवालही त्यांनी केला. सध्या शिवसेनेपेक्षा भाजपला पालिकेत झुकते माप देण्यात येत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

मुंबईत सुमारे ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची दुरूस्ती करण्यासाठी ५ हजार ८०० कोटी रूपयांच्या निविदेची प्रक्रिया मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी सुरू केली. त्यामध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर महामार्ग बांधणीचा अनुभव असणाऱ्या नामांकित कंपन्यांकडून प्रतिसाद मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेच्या निमित्ताने आम आदमी पक्षाने प्रश्न केला आहे. मुंबई भाजपचा एक कार्यकर्ता पत्र लिहून मुंबईच्या रस्त्यांसाठी राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचा अनुभव असणाऱ्या मोठ्या कंपन्यांकडून रस्ते बांधण्याची मागणी करतो. त्या मागणीचा आधार घेत मुंबई महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली. अमित साटम पालिकेला पत्र लिहितात आणि पालिका कोट्यावधीच्या निविदा काढते. त्यांच्याकडे कोणतेही मंत्रालय नसताना पालिका भाजपच्या लाईनवर चालत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.

मुंबई महानगरपालिकेत ज्या पद्धतीने निविदा निघताहेत त्यानुसार शिवसेना पालिकेत नामशेष झाली आहे. याठिकाणी भाजपच्या मागणीनुसारच निविदा प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप शर्मा यांनी केला. मुंबई महानगरपालिकेकडून भाजपने केलेल्या सर्व मागण्यांवर पालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतील भांडणांमुळे सेनेतील कोणताच पदाधिकारी पालिकेत सक्रीय नसल्याची टीका त्यांनी केली. शिवसेना सध्या अंतर्गत भांडणात व्यस्त असून त्यांना मुंबईकरांचे काहीही घेणेदेणे नाही, अशीही प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com