अग्नीशमन यंत्रणा सुधारा नाहीतर मुंबईतील २९ धोकादायक मॉल्स बंदच ठेवा, स्थायी समितीत चर्चा

अग्नीशमन यंत्रणा सुधारा नाहीतर मुंबईतील २९ धोकादायक मॉल्स बंदच ठेवा, स्थायी समितीत चर्चा

मुंबई, ता. २५ : अग्निशमन दलाने नोटीस बजावलेले 29 मॉल अग्निप्रतिबंधक यंत्रणा योग्य करत नाही तोपर्यंत मॉल बंदच ठेवा अशी मागणी आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली. या मॉल्सबाबत झालेल्या पुढील कार्यवाहीची माहिती लवकरता लवकर सादर करुन प्रशासनाकडून असे आश्‍वासन देण्यात आले.

नागपाडायेथील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीनंतर अग्निशमन दलाने मुंबईतील मॉल्सची तपासणी केली. यात, 29 मॉल्समध्ये अग्नीप्रतिबंधक यंत्रणा नियमाप्रमाणे नसल्याने त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. या मॉल्सना 30 दिवसात अग्नीप्रतिबंधक यंत्रणा नियमाप्रमाणे करण्याचे निर्देश दिले आहेत.

सिटी सेंटर मॉलच्या आगीवर आज पुन्हा स्थायी समितीत चर्चा झाली. त्यात, 29 मॉल्सना पाठवलेल्या नोटीशीचाही मुद्दा उपस्थीत झाला. त्यावर या मॉल्सना फक्त नोटीस पाठवू नका तर ते अग्निप्रतिबंधक यंत्रणा पुर्ववत करत नाही तो पर्यंत ते मॉल बंद ठेवा अशी मागणी सदस्यांनी केली.

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी या 30 दिवसाच्या काळात दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार. त्यामुळे या सर्व मॉल्सना टाळेच ठाेका अशी मागणी केली. तर, ज्या मॉल्सना नोटीस पाठवली आहे ती नोटीस मॉल्सचा बाहेर लावा. जेणेकरुन नागरीकांनाही याबाबत कळेल, असा उपाय काँग्रेसचे आसिफ झकेरीया यांनी सुचवला. ज्या मॉल्सना नोटीस पाठवल्या आहेत त्यांच्याबाबत पुढील कार्यवाहीची माहिती स्थायी समितीत सादर करण्याचे आश्‍वासन अतिरीक्त आयुक्त पी. वेलारसू यांनी दिली.

सिटी सेंटर मॉलच्या आगीचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, महिना होत आला तरीही हा अहवाल सादर झालेला नाही, हा प्रश्‍नही सदस्यांनी उपस्थीत केला. सिटी सेंटर मॉल दोन दिवसात सुरु करण्यासाठी राजकीय दबाव आणण्यात आला होता. काही राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून हा दबाव आणला जात असल्याचा आरोप सपचे गटनेते रईस शेख यांनी केला.

अध्यक्षांच्या नावाने नोटीस : 

वरळी येथील एट्रिया माॅल मध्येही अग्निप्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी असल्याने नोटीस पाठविण्यात आली आहे. ही नोटीस चक्क स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी यांच्या नावाने पाठविण्यात आल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. लाेकप्रतिनिधींच्या नावाने नोटीस पाठविण्याच्या प्रकाराबद्दल स्थायी समितीत खळबळ उडाली. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही सदस्यांनी केली. त्यावर संबंधीत अधिकाऱ्याकडून स्पष्टीकरण मागण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

( संपादन - सुमित बागुल )

fix all the issues related to fire fighting system or else keep all 29 malls closed

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com