फ्लिपकार्टच्या मॅनेजर आणि डिलिव्हरी बॉय चोरी प्रकरणी अटकेत; 15 मोबाईल जप्त

ऑनलाईन सेवा देणाऱ्या फ्लिपकार्ट कंपनीतील महागडे मोबाईल चोरून विकून त्याच पैशानी मौजमजा करणाऱ्या फ्लिपकार्ट कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला अटक केली.
Crime News
Crime Newsesakal
Summary

ऑनलाईन सेवा देणाऱ्या फ्लिपकार्ट कंपनीतील महागडे मोबाईल चोरून विकून त्याच पैशानी मौजमजा करणाऱ्या फ्लिपकार्ट कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला अटक केली.

मुंबई - ऑनलाईन सेवा देणाऱ्या फ्लिपकार्ट कंपनीतील महागडे मोबाईल चोरून विकून त्याच पैशानी मौजमजा करणाऱ्या फ्लिपकार्ट कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला मुंबईतील एमएचबी पोलिसांनी गुरुवारी 10 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. मुंबई आणि गुजरातमधून आतापर्यंत आरोपीने विकलेले 15 मोबाईल पोलिसांकडून जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत सुमारे 6.50 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी फ्लिपकार्ड कंपनीचा मॅनेजर प्रणय ढवळ आणि अन्य साथीदार सागर राजगोर आणि भूषण गांगण यांना मुंबईतील विविध भागातून अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी फ्लिपकार्ट कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत फ्लिपकार्ड कंपनीमध्ये नियमानुसार मोबाईलची ऑर्डर रद्द केल्यानंतर ऑर्डर कंपनीकडे परत येत असते परंतु काही दिवसांपासून काही ऑर्डर परत न येता चोरी होण्याच्या घटना सातत्याने होत असून, आतापर्यंत डझनभर मोबाईल गायब झाले असल्याचे म्हंटले आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर एमएचबी पोलिसानी पथक नेमून एकत्रितपणे तपास सुरू केला. पोलिसांनी फ्लिपकार्ट कंपनीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले केले ज्यामध्ये आरोपी मॅनेजर चोरी करताना आढळले.

तपासात कंपनीचा मॅनेजर आणि डिलिव्हरी बॉय हेच मोबाईल चोरत असल्याचे निष्पन्न झाले.तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी असे मोबाईल चोरून मुंबई आणि गुजरातमध्ये विकायचे. आरोपी मॅनेजरच्या संगनमताने ऑर्डर रद्द झालेले मोबाईल चोरून बाहेर स्वस्तात विकण्यात आल्याचे पोलीस तपसात समोर आले. सध्या तिघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून 15 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com