
नोकरदारांनो काळजी घ्या...
मुंबई : कोरोनाची बाध कमी असलेल्या ठिकाणी 20 एप्रिल पासून काही उद्योग आणि व्यवसाय सुरु करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. मात्र, कर्मचार्यांच्या आरोग्य विम्यासह त्यांना द्यायचा सुविधांची यादीच केंद्राने तयार केली आहे.
कर्मचार्यांना काम करण्याच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच बरोबर प्रत्येक कर्मचार्यांचा उष्णांक तपासूनच त्याला कंपनीत प्रवेश द्यावा तसेच प्रवेश दारावर सॅनिटायझरची सोय करावी असे निर्देश केंद्राने दिले आहेत.
कंपन्यांनी कर्मचार्यांना कामाच्या ठिकाणी आणण्यासाठी सार्वजनिक वाहतूकीवर अवलंबून न राहाता स्वता वाहानांची सोय करावी. तसेच एका वाहानात 30 ते 40 टक्के लोक राहातील याची खबरदारी घ्यावी. तसेच शिफ्ट बदलताना किमान एक तासाचे अंतर ठेवावे असे सक्त आदेश देण्यात आले आहेत.
मालकांनी पाच वर्षा खालील मुलं असलेल्या कर्मचार्याला तसेच ज्या कर्मचार्याला ह्रद्यविकार, मधुमेह रक्तदाब तसेच इतर दिर्घाकालीन आजार आहेत अशांना कामावर बोलवू नका. असा सल्लाही केंद्राने दिला आहे.
कामगारानो हे लक्षात ठेवा
केंद्र सरकारकडून एक नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीत बसणारेच उद्योग २० तारखेनंतर सुरु करता येणार आहेत. कोरोना कंटेनमेंट झोनमधील उद्योगांना परवानगी नाही.
'या' बातम्या वाचणं चुकवू नका :
लॉकडाऊनमध्येही Tata Motors ने सुरु केली गाड्यांची विक्री; टाटा मोटर्सची एक नंबर आयडिया...
डिटेल नियमावली जाहीर; २० एप्रिलपासून काय सुरु, काय बंद... वाचा
मुंबईतील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमागील नेमके कारण काय?
"राज्यावर आता दुसरं संकट", फेसबुक लाईव्हमध्ये काय म्हणालेत शरद पवार...
'कोरोना'बाधिताना किती फायद्याची आहे 'हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन'ची गोळी ? डॉक्टर म्हणतायत...
follow these guidelines if company owners wishes to start their business after 20th april