ठेका अभियंता युवराज पाटील पाठोपाठ स्वरूप खानोलकर घरी

आयुक्तांच्या या कारवाईचे नागरिकांतून स्वागत करण्यात येत
mumbai
mumbaisakal

विरार : वसई-विरार (Vasai-Virar) शहर महापालिकेच्या (Municipal) पेल्हार विभागाचा ठेका अभियंता युवराज पाटील (Yuvraj Patil) याला अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात अकार्यक्षमता दाखवल्याप्रकरणी तसेच कर्तव्यात वारंवार कसूर केल्याप्रकरणी आयुकातीनी घरी बसवले असतानाचा काल आयुक्तांनी स्वरूप खानोलकर (Swaroop Khanolkar) याला हि घरी बसवून अनधिकृत बांधकामांना स्वरक्षण देणाऱ्यांना इशाराच दिला आहे.

वसई विरार महापालिका क्षेत्रातील वालिव प्रभागातील उद्यान विभागात स्वरूप खानोलकर यांची बदली करण्यात आली होती. त्याच प्रमाणे त्यांच्याकडे या प्रभागातील अनधिकृत बांधकामे आणि कर संकलन विभागाचा हि कार्यभार देण्यात आला होता. परंतु हा कार्यभार सांभाळण्यास खानोलकर अपयशी ठरल्याचा ठपका ठेवन्यात आला आहे. त्याच बरोबर बोळींज येथील मलनिःसारण विभागातही त्यांचे काम बरोबर नसल्याचा थापालका ठेऊन आयुक्त गंगाधरन डी यांनी खानोलकर यांना घरचा रस्ता दाखवला आहे.

mumbai
पुणे : असे काय झाले की, भाजपचे 'हे' खासदार भडकले आयुक्तांवर...

आयुक्तांच्या या कारवाईचे नागरिकांतून स्वागत करण्यात येतअसले तरी एका सहायक आयुक्ताने अतिरिक्त आयुक्तांवर केलेल्या आरोपा बाबत आता आयुक्त काय कारवाई करतात याकडे सारीचें लक्ष लागून राहिले आहे. तर दुसर्या बाजूला अतिरिक्त आयुक्तांच्या निलंबनाची काँग्रेसचे सचिव निलेश पेंढारी हे उद्या पालिकेत आंदोलन करणार असल्याने आता आयुक्त अतिरिक्त आयुक्तांना पाठीशी घालतात कि, त्यांच्यावर हि कारवाई करणार यामध्ये साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com