
मुंबई : राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेसळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे 'सणासुदीचे विशेष तपासणी अभियान' राबविण्यात येणार आहे. ग्राहकांना निर्भेसळ शुद्ध, स्वच्छ व उत्तम प्रतीचे अन्न उपलब्ध करून देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी केले.