esakal | १२ ते १८ वयोगटातील मुलांचे डिसेंबरमध्ये लसीकरण ?
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

१२ ते १८ वयोगटातील मुलांचे डिसेंबरमध्ये लसीकरण ?

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम (Vaccination) नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरूवातीस सुरू होण्याची शक्यता आहे. कारण संपूर्ण शहरात शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत, असे महाराष्ट्र बालरोग टास्क फोर्सकडून (task force) स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय, डॉक्टरांनी सुचवले की लस कॉमोरबिडिट म्हणजेच सहव्याधी असलेल्या मुलांना द्यावी.

पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, "12 ते 18 वयोगटातील 10 लाख मुले आहेत आणि ते त्यांच्यासाठी लसीकरण सुरू करण्यास तयार आहेत परंतु, ते आयसीएमआरकडून मार्गदर्शक तत्त्वांची वाट पाहत आहेत" बालरोग तज्ज्ञ आणि बालरोग राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुल पारेख यांनी सांगितले की, "आता शहरातील बहुसंख्य लोकांनी कोविड लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यामुळे आता विशेषतः लहान मुलांवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे"

“एक क्लिनिकल ट्रायल सुरू आहे, ज्यामध्ये कोविड लस मुलांना दिली जात आहे, यातुन अपेक्षा करतो की या वर्षाच्या अखेरीस कमीतकमी दोन लसी असतील ज्या फक्त मुलांसाठी असतील.बंगालसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करण्याचा प्रयत्न, NCP चा आरोप

हेही वाचा: बंगालसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करण्याचा प्रयत्न, NCP चा आरोप

दरम्यान, झायकोव्ह डी , झायडस ही लस लसीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून लवकरच सादर केली जाण्याची शक्यता आहे. “ आमच्याकडे 325 लसीकरण केंद्रे आहेत आणि जेव्हा मुलांची लसीकरण मोहीम राबवली जाईल. तेव्हा गर्दीही फार कमी होईल. जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही. शिवाय, आम्ही सर्व लसीकरण केंद्रांना आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मुलांना लसीकरणासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत"

हेही वाचा: NCBकडून 'त्या' दोघांविषयी उडवाउडवीची उत्तरं! काँग्रेसचा आक्षेप

आतापर्यंत, 10-19 या वयोगटातील 35, 753 मुले आणि 0-9 वयोगटातील 13, 931 मुलांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण प्रौढ लोकसंख्येला लसीकरण करण्याची पालिकेची योजना आहे. जेजे रुग्णालयातील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ म्हणाले की, "केंद्र सरकारने तातडीने मुलांसाठी लस आणावी आणि कोविडच्या रुग्णांमध्ये फारशी वाढ झालेली नाही हे लक्षात घेऊन त्यांना लसीकरण सुरू करावे.  पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान मुलांनाही तितकेच संक्रमण झाले आहे, त्यामुळे लसीकरण करणे अधिक महत्वाचे आहे"

loading image
go to top