esakal | ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राला मिळाले इतके लाख डोस

बोलून बातमी शोधा

Vaccination
४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राला मिळाले इतके लाख डोस
sakal_logo
By
मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: आज राज्याला कोविशिल्ड (covieshield doses)लसींचे 9 लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण (For above 45 age group vaccination)केले जाईल. 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी सुमारे 18 लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात 45 वर्षांवरील सुमारे 1 कोटी 65 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कालपर्यंत राज्यात या वयोगटाच्या लसीकरणासाठी केवळ 25 हजार डोस शिल्लक होते. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद होते. आज राज्याला 9 लाख डोस मिळाले आहेत. त्यातून 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. 45 वर्षांवरील सुमारे 3.5 कोटी लोकसंख्येपैकी 45 टक्के नागरिकांना लसीकरण झाले आहे. (For above 45 age group vaccination maharashtra got 9 lakh covieshield doses)

हेही वाचा: CT Scan कधी करावं? तात्याराव लहाने म्हणतात...

राज्यात 1 मेपासून 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणास सुरूवात झाली. आतापर्यंत या वयोगटातील सुमारे 1 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यांच्या लसीकरणाला गती येण्यासाठी कोविशिल्ड लसीचे 13 लाख 58 हजार तर कोवॅक्सिन लसीच्या 4 लाख 89 हजार असे एकूण 18 लाखांहून अधिक डोसेस खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.

राज्य शासनाने रेमडेसीवीर, ऑक्सिजन यासाठी काढलेल्या जागतिक निविदेला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. मदत व पुर्नवसन विभागाकडून त्याची छाननी आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. या जागतिक निविदेच्या माध्यमातून राज्याला साडेतीन लाख रेमडेसीवीर, 20 हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, 27 स्टोरेज टॅंक उपलब्ध होतील. जेणे करून ऑक्सिजनचा बफर साठा करून ठेवता येईल.

हेही वाचा: १५ मे नंतर लॉकडाउन वाढेल का? तात्याराव लहाने म्हणतात....

राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत 150 ऑक्सिजन प्लांट (हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे) खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पासाठी जिल्हा विकास व नियोजन आणि राज्य आपत्ती पुर्नवसन निधी यामधून निधी घेण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाकडून राज्याला जे 10 पीएसए प्लांट मंजूर आहेत त्यातील 9 प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या केंद्र शासनाकडून राज्याला दररोज 40 हजाराच्या आसपास रेमडीसीवीर मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे ते कमी पडत आहेत. पुरवठा झालेले रेमडेसीवीर जिल्ह्यांच्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांना वाटप केले जात आहेत.

स्पुटनिक लस भारतात आली असून तिच्या दराबाबत चर्चा सुरू असून ते निश्चित झाल्यानंतर त्याचे डोस राज्यात मागविले जातील. तरुणाईने लसीकरणासाठी गर्दी करू नये. पोर्टलवर नोंदणी आणि दिनांक, वेळ निश्चिती नंतरच लस दिली जाईल. त्यामुळे संयम आणि शिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.