Drones Deployed to monitor election process
ESakal
ठाणे : ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या महापालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी ठाणे शहर पोलिसांनी सुरक्षेचे कडेकोट नियोजन केले आहे. यंदाच्या निवडणुकीत तंत्रज्ञानाचा मोठा वापर करण्यात येणार असून, संपूर्ण पोलिस आयुक्तालय क्षेत्रात १०५ ड्रोनद्वारे हवाई पाळत ठेवली जाणार आहे. सुरक्षेला आधुनिक कवच देण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याला किमान तीन ड्रोन वापरण्याचे आदेश दिले आहेत.