

Fraud Against Foreign Woman in mumbai
ESakal
मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच आर्थिक फसवणुकीचा अनुभव एका अमेरिकन महिलेने मुंबई पोलिसांच्या एक्स हँडलवर पोस्ट केला. त्यावर नेटकऱ्यांनी धडाधड व्यंगात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली; मात्र या महिलेने भारतावरील माझे प्रेम, हा देश आणि देशवासीयांबद्दलचे माझे मत एका अनुभवामुळे बदलणार नाही, अशा भावना व्यक्त करत टोमणे मारणाऱ्या, आपल्याच देशाचा अपमान करणाऱ्या नेटकऱ्यांचे तोंड बंद केले. हा प्रकार प्रजासत्ताकदिनी अर्थात २६ जानेवारी रोजी घडला.