esakal | आरे कॉलनीतील हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद, सात जणांवर केला होता हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

aarey colony leopard

आरे कॉलनीतील हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : आरे कॉलनीतील (aarey colony leopard) सात हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून पिंजरे लावले होते. त्यातील यूनिट क्रमांक 3 येथील लावलेल्या पिंजऱ्यात आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक बिबिट्या अडकला.

हेही वाचा: आरे कॉलनीत बिबट्याचा महिलेवर हल्ला, दृश्य CCTV मध्ये कैद

आरे कॉलनीतील ६४ वर्षीय महिला बुधवारी सीईओ कार्यालयाबाहेर बसली होती. यावेळी बिबट्याने अचानक मागच्या बाजूने हल्ला केला होता. महिलेने आक्रमक पवित्रा घेताच बिबट्याने झडप घेऊन महिलेला खाली पाडले. मात्र, महिलेने पाय आणि हातातील काठीने बिबट्यावर पलटवार केला. त्यामुळे बिबट्या पळून गेला. त्यांचा आवाज ऐकून कुटुंबीय धावून आले. झटापटीमध्ये महिलेला किरकोळ जखम झाली असून त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱामध्ये कैद झाले आहे. त्यानंतर नागरिकांनी रोष व्यक्त केला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून आरे कॉलनी परिसरात या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत. हल्लेखोर बिबट्याला पळवून लावण्याची मागणी केली जात होती. बुधवारी रात्री ही घटना घडताच वनविभागाची टीम या परिसरात दाखल झाली होती. हल्लेखोर बिबट्याला पळवून लावण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावले होते. अखेर या हल्लेखोर बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.

loading image
go to top