Ganesh Naik: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर! वनमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाबाबत प्रतीक्षा लागली आहे. मात्र अशातच उद्घाटनाबाबत वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.
Navi Mumbai International Airport

Navi Mumbai International Airport

ESakal

Updated on

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाबाबत अनेकांना प्रतीक्षा लागली आहे. अशातच या विमानतळाचे उद्घाटन येत्या ३० सप्टेंबर रोजी होणार असल्याचे समोर आले आहे. तर काही दिवसांपूर्वी या विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र आता ३० तारखेला या विमानतळाचे लोकार्पण होणार नाही अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com