

Ganesh Naik Says On Leopard Attack
ESakal
भाईंदर : बिबट्यांचे मानवी वस्तीवर हल्ले होऊ नयेत, यासाठी कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून सतर्कता बाळगली जात आहे. भविष्यात हे हल्ले लोकांच्या जीवावर बेतणार नाहीत यासाठी वन विभाग व सरकार सतर्क राहणार आहे, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. बिबट्याने हल्ला केलेल्या भाईंदर येथील पारिजात इमारतीला भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.