भाजपच्या 4 नगरसेवकांचा राजीनामा, आणखी 5 नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत...

भाजपच्या 4 नगरसेवकांचा राजीनामा, आणखी 5 नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत...

नवी मुंबई  : भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशन पार पडून 24 तासही उलटत नाही तोच भाजपच्या चार नगरसेवकांनी पदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. नाईकांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेली तुर्भेतील नगरसेवक सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्के आणि मुद्रीका गवळी अशी या चार नगरसेवकांची नावे आहेत. या नगरसेवकांच्या राजीनाम्यामुळे भाजपसह आमदार गणेश नाईक यांना मोठा धक्का समजला जात आहे.  

राज्यात महाविकास आघाडीच्या यशस्वी प्रयोगानंतर आणि दिल्लीत आपने भाजपला दिलेल्या धक्‍क्‍यामुळे सर्व ठिकाणी भाजपची पिछेहाट होत आहे. तसेच एप्रिल महिन्यात होत असलेल्या नवी मुंबई व औरंगाबाद महापालिका निवडणूकांच्या या पार्श्‍वभूमिवर भाजपतर्फे नवी मुंबईतील राज्यव्यापी अधिवेशन घेण्यात आले होते. दोन दिवसांच्या या अधिवेशनात केंद्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नामांकीत नेत्यांनी पक्ष संघटन व मोर्चे बांधणीबाबत उपदेशाचे डोस कार्यकर्त्यांना पाजले होते.

15 व 16 फेब्रुवारी या दोन दिवसात हे अधिवेशन संपन्न झाले होते. परंतू या अधिवेशनानंतर काही तासही उलटले नाहीत तर नाईकांच्या गोटातून चार नगरसेवक फुटले आहेत. सुरेश कुलकर्णी यांच्यासारखा तीन वेळा असलेले नगरसेवक तसेच त्यांनी निवडून आणलेले तीन असे एकूण चार नगरसेवकांनी सोमवारी महापालिका सचिवांकडे राजीनामे सोपवले आहेत. या राजीनाम्यामुळे निवडणूकी आधीच नाईकांच्या साम्राज्याला नवी मुंबईत धक्के लागण्यास सुरुवात झाली आहे. सुरेश कुलकर्णी लवकरच त्यांच्या इतर तीन नगरसेवकांसोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते आहे.

प्रवेशासाठी पक्षाचा अडसर होऊ नये म्हणून कुलकर्णी यांनी कालावधी संपण्याआधीच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निश्‍चित केले आहे. कुलकर्णींच्या पावलावर पाऊल ठेवत तुर्भे, ऐरोली आणि सीबीडीतील पाच नगरसेवकांनी अलिकडच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत दिले होते. कुलकर्णींच्या राजीनाम्यामुळे या नगरसेवकांकडूनही कोणत्याही क्षणी राजीनामा देण्याची दाट शक्‍यता पालिका वर्तुळात वर्तवली जात आहे. 

भाजप मुस्लिम उमेदवाराच्या शोधात 

नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या प्रवेशामुळे तुर्भेमध्ये भाजपला मोठा खिंडार पडला आहे. तुर्भेतून कुलकर्णींसारख्या बलाढ्य नगरसेवकासमोर उभा करण्यासाठी भाजपकडे उमेदवार नाही. तसेच तुर्भे हा अल्पसंख्याक मतदारांचा मतदार संघ असल्यामुळे भाजपकडून उमेदवार शोधाचे काम सुरू आहे. मुस्लिम मते आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपकडून मुस्लिम उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे समजते आहे. 

four bjp coroprators resigned in navi mumbai 5 more will resign soon

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com