esakal | भाजपच्या अधिवेशनाच्या २४ तासाच्या आत भाजपच्या ४ नगरसेवकांचा राजीनामा...
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपच्या अधिवेशनाच्या २४ तासाच्या आत भाजपच्या ४ नगरसेवकांचा राजीनामा...

भाजपच्या अधिवेशनाच्या २४ तासाच्या आत भाजपच्या ४ नगरसेवकांचा राजीनामा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - नवी मुंबई नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता वातावरण चांगलंच तापायला लागलंय. अशात भाजपासाठी अत्यंत धक्कादायक बातमी आता समोर येते. काल आणि परवा नवी मुंबईत भाजपचं राज्यव्यापी अधिवेशन पार पडलं. येत्या निवडणूक लक्षात घेता महाविकास आघाडीसोबत चार हात करण्यासाठी भाजप तयार आहे असं वाटत असतानाच भाजपाला मोठा धक्का बसलाय.

भाजपच्या अधिवेशनाच्या अवघ्या २४ तासांच्या आता भाजपच्या ४ नगरसेवकांनी भाजपाची साथ सोडलीये. हे चारही नगरसेवक गणेश नाईक यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. भाजपच्या चार नगरसेवकांचा राजीनामा म्हणजे गणेश नाईकांसाठी धोक्याची घंटा मनाली जातेय. 

मोठी बातमी - तब्बल ५९ वर्षानंतर येणार 'हा' योग; यंदाची महाशिवरात्र असणार विशेष...

सदर राजीनामा देणारे हे नगरसेवक प्रभाग क्रमांक ६८, ६९, ७० आणि ७३ मधील आहेत. सुरेश कुलकर्णी, राधाताई कुलकर्णी, संगिता वास्के, मुदिका गवळी यांनी आयुक्तांकडे आपला राजीनामा सुपूर्त केलेला आहे. दरम्यान राजीनामा देणारे चारही नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय. आपल्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला असल्याचं या नगरसेवकांनी म्हटलंय. 

या आधी काही नगरसेवकांनी थेट मंत्रालयात जात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे गणेश नाईक यांच्यासोबत भाजपात प्रवेश करणारे ५० पेक्षा अधिक नगरसेवक आता भाजपाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतायत.  

मोठी बातमी - आता पेट्रोल पंपावरच विकत घ्या नवी कोरी कार, कशी ? वाचा बातमी...

गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अशात अजित पवार यांनी स्वतः नवी मुंबई महानगरपालिका महाविकास आघाडीकडे पुन्हा नेण्याचा विडा उचलला आहे. नवी मुंबईत अधिवेशन घेत कुणाचीही एकाधिकारशाही खपवून घ्यायची नाही असा संदेश अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. ज्या गावची बोरी त्याच गावची बाभळी असं देखील अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं.   

four corporators from navi mumbai bjp resigned big blow to ganesh naik in navi mumbai

loading image