

Lalbaugcha Raja Darshan Fraud
ESakal
मुंबई : मुंबईतील सुप्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी राजूभ्रातुल भाविक मुंबईत येत आहेत. गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून लांबच लांब रांग लागत असल्याचे दिसून येत आहे. राजाच्या दर्शनासाठी तासंतास भाविक रांगेत उभे राहत असल्यामुळे थेट दर्शन मिळावे, अशी अनेक भाविकांची इच्छा असते. अशातच लालबागच्या राजाचे थेट चरणस्पर्श दर्शन घडवून आणणार, अशी फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.