नालासोपाऱ्यात दीड कोटीचे कोकेन जप्त; 4 नायजेरियन तरुण अटकेत 

विजय गायकवाड
Monday, 2 November 2020

नालासोपाऱ्यात कोकेनची विक्री करण्यासाठी आलेल्या चार नायजेरियन तरुणांना तुलिंज पोलिसांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 1 कोटी 49 लाख 58 हजार रुपये किमतीचे 747 ग्रॅम वजनाचे कोकेन पोलिसांनी जप्त केले आहे. याबाबत तुलिंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नालासोपारा   : नालासोपाऱ्यात कोकेनची विक्री करण्यासाठी आलेल्या चार नायजेरियन तरुणांना तुलिंज पोलिसांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 1 कोटी 49 लाख 58 हजार रुपये किमतीचे 747 ग्रॅम वजनाचे कोकेन पोलिसांनी जप्त केले आहे. याबाबत तुलिंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

"एवढ्या जणांना खंडणीसाठी धमकावलयं, आता आठवतही नाही"

आगू ओसीता (28), उर्जी फिलिप्स (30), ओगोना चुकवेनेने (29) आणि ख्रिस अजाह चुकवेनेका (30) असे अटक केलेल्या चार नायजेरियन आरोपींची नावे आहेत. 
नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर परिसरात नायजेरियन कोकेन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती तुलिंज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. पाटील यांना मिळाली होती. माहितीनंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत अवघडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष सोलनकर, पोलिस उपनिरीक्षक मल्हार थोरात यांच्या नेतृत्वाखाली दोन टीम बनवून प्रगती नगर परिसरात सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली.

बांग्लादेशी घुसखोरांना एमआयएम आमदारांचे पाठबळ? भाजपकडून अटकेची मागणी

त्यांच्याकडून दीड कोटींचे साडे सातशे ग्रॅम कोकेन पोलिसांनी जप्त केले आहे. तुलिंज पोलिस ठाण्यात चारही आरोपींविरोधात एनडीपीएसप्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती तुलिंज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय पाटील यांनी दिली आहे.

Four Nigerian youths arrested for selling cocaine in Nalasopara
( संपादन ः रोशन मोरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Nigerian arrested for selling cocaine in Nalasopara