'या' पालिका क्षेत्रात कोव्हिड उपचारासाठी चार खासगी रुग्णालये

hospital.
hospital.
Updated on

वसई : वसई-विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणुंचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नव्याने चार खासगी रुग्णालयांना कोरोना उपचार करण्याबाबत सूचना पालिका प्रशासनाने दिल्या आहेत. वसई-विरारमध्ये अडीच हजार कोरोनाबाधित झाले. यातील सुमारे हजार रुग्ण इस्पितळात उपचार घेत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या आधी वसई-विरार महापालिकेच्या रिंद्धी-सिद्धी विनायक, गोल्डन पार्क, विनायक, विजय वल्लभ, स्टार या पाच रुग्णालयांत कोव्हिडनुसार राखीव खाटा ठेवण्यात आल्या आहेत, तर आता नव्याने वसई रेंजऑफिस येथील प्लॅटिनम, एव्हरशाईन भागातील आयएसआयएस , जनसेवा हेल्थकेअर, बाभोळा आणि विरार पूर्वेकडील चंदनासार येथील वेलक्युअर या 4 खासगी रुग्णालयात स्वखर्चाने उपचार घेता येणार आहेत, मात्र रुग्णालयाने सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार कोरोना उपचारासाठी सोय करून द्यावी, अशा सूचना वसई-विरार महापालिका प्रशासनाने केल्या आहेत.

काही तक्रारी आढळल्यास कोरोना कंट्रोल युनिट 0250 - 2334546 / 23345467 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांनी केले आहे.

Four private hospitals for covid treatment in vasai municipal area

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com