esakal | मुंबईत होणार चौथा सिरो सर्वे; पालिकेच्या 6 वाॅर्ड्सचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत होणार चौथा सिरो सर्वे; पालिकेच्या 6 वाॅर्ड्सचा समावेश

मुंबईत होणार चौथा सिरो सर्वे; पालिकेच्या 6 वाॅर्ड्सचा समावेश

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड
  • झोपडपट्टी, मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू अशा वस्तीतील प्रत्येकी दोन वॉर्ड्सची निवड

मुंबई: पालिकेच्या अखत्यारितील सहा वाॅर्ड्समध्ये प्रशासनाकडून सिरो सर्वे (Sero Survey) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन झोपडपट्टी (Slum), दोन मध्यमवर्गीय (Middle Class) वस्त्या आणि दोन उच्चभ्रू वाॅर्ड्समध्ये (Elite Class) सिरो सर्वे पालिकेकडून करण्यात येणार आहे. सिरो सर्वेमध्ये ठराविक वस्त्यांमधील काही नमुन्यांचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार उपाययोजना केल्या जातात. दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील नागरिकांमध्ये (Mumbaikars) किती प्रमाणात अँटीबाॅडी (Antibody) विकसित झाली आहे, याचा शोध घेण्यासाठी हा सिरो सर्वे केला जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली. झोपडपट्टी भागात, उच्चभ्रू भागात, मध्यमवर्गीय भागातील किती नागरिकांमध्ये अँटी-बॉडीज विकसित झाल्या हे समजण्यासाठी सर्वच स्तरावरुन सिरो सर्वे केला जाईल. झोपडपट्टी भागात आधी केलेल्या सिरो सर्वेमध्ये 70 टक्के प्रमाण होते. त्यानंतर, दुसऱ्या आणि तिसऱ्या सिरो सर्वेमध्ये हे प्रमाण अनुक्रमे 45 आणि 41 झाले. पण, त्या सिरो सर्व्हेच्या अहवालाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे चौथा सिरो सर्व्हे केला जाणार आहे. (Fourth sero survey in Mumbai BMC wards with fewer Covid-19 cases)

हेही वाचा: विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलंत तर... -आशिष शेलार

पुन्हा केल्या जाणार्‍या सिरो सर्वेसाठी 6 वाॅर्ड्सची निवड करण्यात आली आहे. त्यात दोन निम्नस्तरीय वाॅर्ड, दोन मध्यमवर्गीय वाॅर्ड आणि दोन उच्चभ्रु वाॅर्ड अशा सहा वाॅर्डचा या सिरो सर्वेत समावेश आहे. एच पश्चिम किंवा डी वाॅर्ड जिथे कमी प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत, असे वाॅर्ड उच्चवर्गीय निवडले जातील. तिन्ही वर्गातील वॉर्ड सिरो सर्वेसाठी निवडले जाणार आहेत.

या 6 वाॅर्ड्सची निवड-

निम्नवर्गीय वाॅर्डमध्ये एम पूर्व, एल वाॅर्ड, मध्यमवर्गीय वाॅर्डमध्ये सी आणि बी वाॅर्ड, तर एच पश्चिम आणि डी या दोन वाॅर्ड्सचा उच्चस्तरीय वाॅर्डमध्ये निवड करुन तिथल्या नागरिकांचा सिरो सर्वे केला जाईल.

हेही वाचा: "जिनके अपने घर शिशे के होते है..."; कोर्टाने परमबीरना सुनावलं

नमुन्यांची संख्या वैद्यकीय विभाग ठरवणार-

या सिरो सर्वेत किती लोकांचे नमुने घ्यायचे हे वैद्यकीय टीम ठरवणार आहे. येत्या 15 दिवसांत या सिरो सर्वेला प्रत्यक्षात सुरूवात होईल. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात त्या सिरो सर्वेचा अहवाल प्रसिध्द केला जाईल असा एकूण प्रयत्न आहे.

दोन महिन्यांचा कालावधी-

ठरवलेले नमुने घेऊन ते गोळा करुन त्यातून किती लोकांमध्ये अँटी-बॉडीज विकसित झाली हे समजण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल. तिसरी लाट येण्यापूर्वी तो अहवाल प्रसिध्द करावा हा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती काकाणी यांनी दिली.

हेही वाचा: माझं गटार माझी जबाबदारी; मनसेचा शिवसेनेवर जिव्हारी लागणारा वार