Crime News : भाजप आमदार आशिष शेलारांच्या नावाने फसवणूक; वांद्रे पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

तक्रारीत नमूद आरोपी व्यक्ती आशिष शेलार यांच्या नावाचा वापर
Fraud BJP MLA Ashish Shelar Crime in Bandra Police mumbai
Fraud BJP MLA Ashish Shelar Crime in Bandra Police mumbaiesakal

मुंबई : मुंबईतील वांद्रे पोलीसांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्या स्वीय सहायकाने दिलेल्या तक्रारीवरुन एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत नमूद आरोपी व्यक्ती आशिष शेलार यांच्या नावाचा वापर.

करुन लोकांची दिशाभूल करत फसवणूक करत असल्याचे पुढे आले आहे. या व्यक्तीने मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याचे अनेकांना अश्वासन दिले आहे. हे अमिष दाखवताना तो आशिष शेलार यांच्याशी त्याचे चांगले संबंध असून त्यांच्या वजनाने महापालिकेत नोकरी मिळवून द्यायचे आमिष दाखवत असे.

त्याबदल्यात मोठी रक्कम उकळण्याचा आरोपीवर आरोप आहे. आशिष शेलार यांच्या नावाचा वापर करत असल्याच्या तक्रारी आल्यावर शेलार यांच्या स्वीय सहायकाने या संदर्भात वांद्रे पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. वांद्रे पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com