
नवी मुंबई : तंत्रमंत्राचा वापर करून पैसे दुप्पट करण्याचे प्रलोभन दाखवत एका साधूने मिरा रोड येथील वकिलाला २० लाखांचा गंडा घातल्याची घटना सीबीडीत उघडकीस आली आहे. प्रेमसिंग साधू (४०) असे त्याचे नाव असून सीबीडी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. फसवणुकीत घरमालक अनंत नरहरी (६५) यांचाही सहभाग असल्याचे तपासात आढळल्याने पोलिसांनी त्याला सहआरोपी केले.