'एटीएम'मधून रक्कम काढून देण्याच्या बहाण्याने फसवणूक; त्रिकुट गजाआड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

गेल्या बुधवारी (ता. 24) कोनगाव  येथील युनियन बँक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या मजूराला मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्या एटीएम कार्डाद्वारे 25 हजार काढून फसवणूक केल्याची घटना घडली होती.

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कोनगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या सामान्य नागरिकांना मदत करीत असल्याचे भासवून त्यांचे एटीएम कार्ड चोरून, त्याद्वारे पैसे काढून फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाच्या मुसक्या आवळण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : कोरोना मागोमाग लागूनच मुंबईवर येऊ शकतं 'हे' मोठं संकट; मुंबईकरांना वाचवणार आता एकच गोष्ट...

गेल्या बुधवारी (ता. 24) कोनगाव  येथील युनियन बँक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या मजूराला मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्या एटीएम कार्डाद्वारे 25 हजार काढून फसवणूक केल्याची घटना घडली होती. ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश काटकर व अन्य पोलिसांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार कोनगाव येथे संशयास्पद फिरणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता 24 जून रोजी हातचलाखी करून 25 हजार रुपये काढल्याचे त्यांनी कबूल केले.

हेही वाचा : मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये दिसून येतंय 'हे' नवीन लक्षण, डॉक्टर्स देखील झालेत हैराण..

तसेच कोनगाव  पोलिस ठाण्यात 10 जून रोजी युनियन बँक एटीएम येथे अशाच पद्धतीने 69 हजार काढल्याचीही कबुली दिली. या त्रिकुटाकडून 47 हजार रोख रक्कम, 12 हजार रुपयांचे दोन मोबाईल व 80 हजार रुपये किमतीची एक दुचाकी असा एकूण एक लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिस निरीक्षक काटकर तपास करीत आहे.

Fraud under the pretext of withdrawing money from an ATM


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud under the pretext of withdrawing money from an ATM