ठाणेकरांसाठी कोरोना चाचणीची मोफत सोय, 'हे' आहे तपासणी केंद्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 एप्रिल 2020

मुंबईला पाठविण्यात येणाऱ्या स्वॅबच्या नमुन्याच्या अहवालासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाण्यातील वाडिया रुग्णालयात मोफत कोरोना तपासणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी दिवसाला 100 चाचण्या करण्यात येणार आहे. त्यांचे अहवालही 24 तासाच्या आत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

ठाणे: ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यात तपासणीसाठी मुंबईला पाठविण्यात येणाऱ्या स्वॅबच्या नमुन्याच्या अहवालासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाण्यातील वाडिया रुग्णालयात मोफत कोरोना तपासणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी दिवसाला 100 चाचण्या करण्यात येणार आहे. त्यांचे अहवालही 24 तासाच्या आत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

मोठी बातमी  : ठाण्यात आणखी एका कोरोनाबाधितचा मृत्यू, रुग्णांचा आकडा 100 पार

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 313 वर पोहोचली आहे. तर, ठाणे शहरात कोरोनाबाधितांचा आकडा आजच्या घडीला 108 च्यावर पोहोचला आहे. तसेच शेकडो जणांना क्वॉरन्टाइन करण्यात आले आहे. यातील अनेकांच्या चाचण्या पालिका किंवा जिल्हा यंत्रणांकडून करण्यात आल्या आहेत. परंतु अनेकांच्या चाचणी अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. 

महत्वाची बातमी : मातांनो, आता बाळाची काळजी घ्या!

अहवाल येण्यास विलंब होत असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय आणि पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यासाठी खाजगी लॅबकडून 4500 रुपये आकारले जात आहेत. चाचणीसाठी खासगी लॅबकडून आकारण्यात येणारे पैसे अनेकांच्या आवाक्याबाहेरील आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका हद्दीत मोफत कोरोना चाचणीची लॅब असावी, अशी मागणी करण्यात येत होती. 

हे ही वाचाThank You मुंबई पोलिस ! गोरगरीब, झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांचं मिशन भूक

जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा
ठाण्यातील वाडिया रुग्णालयात अखेर शनिवारपासून मोफत कोरोना चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहे.  या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून ज्या नागरीकांना होम क्वॉरान्टाइन करण्यात आले आहे. ज्या नागरीकांना विविध ठिकाणच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, त्यांच्या चाचण्या आता केल्या जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

 

free corona test for thanekars in wadia hospital 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: free corona test for thanekars in wadia hospital