Corona : गरिबांवरील मोफत कोरोना उपचारासाठी 'ही' रुग्णालये सज्ज 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 मे 2020

होरायझन प्राईम रुग्णालयानंतर आता सफायर आणि वेदांत या रुग्णांलयांमध्ये देखील ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित गरजू नागरिकांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार सुविधा रविवार (ता.3) पासून सुरू करण्यात आली आहे.

ठाणे : हॉरायझन प्राईम रुग्णालयानंतर आता सफायर आणि वेदांत या रुग्णांलयांमध्ये देखील ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित गरजू नागरिकांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार सुविधा रविवार (ता.3) पासून सुरू करण्यात आली आहे.

 नक्की वाचा कोरोना योद्धांना भारतीय हवाई दलाकडून अनोखी मानवंदना

पालिका क्षेत्रातील कोरोनासाठी राखीव केलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार मिळावेत यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर पिवळे, केशरी रेशनकार्डधारक व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना हॉरायझन प्राईम हॉस्पिटलमध्ये याधीच मोफत उपचार सुविधा सुरू करण्यात आली असून आता सफायर आणि वेदांत हॅास्पिटलमध्येही ही योजना सुरू करण्यात आली आहे. 

हे ही वाचा  : Lockdown : 'साहेब, आम्हाला गावी जायचंय'..., आपत्ती व्यवस्थापन कक्षेत फोनचा खणखणाट

या योजनांतर्गत उच्च प्रतीचे उपचार,  अत्याधुनिक सुविधा व पौष्टिक जेवण सर्व रूग्णांना विनामूल्य उपलब्ध देण्यात येणार आहे. दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य या योजनेसाठी नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक 14555 / 1800111565 वर, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी 155388 / 18002332200 वर, तर सफायर रुग्णालयासाठी 022- 25333222 व वेदांत रुग्णालयासाठी  022- 25988000/03, 9892507700 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 Free treatment on the corona for the poor at Sapphire and Vedanta hospital


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free treatment on the corona for the poor at Sapphire and Vedanta hospital