कोरोनाबाधितांवर होणार 'मोफत' उपचार, 'या' शहरातील नागरिकांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 मे 2020

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनें’तर्गत कोरोनाबाधित रूग्णांना मोफत उपचार दिले जाणार आहेत.

ठाणे : ‘कोविड-१९’या आजाराची लागण झालेल्या गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी सरकारने नवी योजना आखली आहे. त्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गरजू रूग्णांना ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनें’तर्गत कोरोनाबाधित रूग्णांना मोफत उपचार दिले जाणार आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्यातून येथील हॉरिझॉन प्राईम या खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी २५ टक्के खाटा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता कोरोना रूग्णांना दिलासा मिळाला आहे. 

मोठी बातमी : 'या' तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार विधान परिषद आमदार...

कोविड –१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. मुंबईसह ठाण्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. हे लक्षात घेत ठाण्यातील हॉरिझॉन प्राईम रूग्णालय ‘कोविड रूग्णालय’म्हणून घोषित झाले आहे. सध्या या रूग्णालयात फक्त कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाढत्या रूग्णसंख्येमुळे हॉरिझॉन प्राईम या खासगी रूग्णालयात २५ टक्के खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त कुठलाही रूग्ण ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनें’तर्गत योजनेंतर्गत या रूग्णालयात उपचार घेऊ शकेल. हॉरिझॉन प्राईम या रूग्णालयातील वैद्यकीय संचालक आणि पल्मोनरी फिजिशियन क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉ. ऋषिकेश वैद्य याबाबत म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत असून यावरील उपचारांचा खर्चही प्रचंड आहे. सामान्य गरीब रूग्णांना हा खर्च परवडण्याजोगा नाही. यामुळे बहुतेक रूग्ण उपचारासाठी रूग्णालयात येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. हे जाणून महात्मा जोतिबा फुले या सरकारी योजनेतंर्गत कोविड-१९ रूग्णांना मोफत उपचार दिले जावेत, अशी विनंती ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. ही विनंती मान्य करत रूग्णालयातील २५ टक्के खाटा गरजू कोरोनाबाधित रूग्णांसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. या रूग्णांना मोफत वैद्यकीय उपचार पुरवले जाणार आहेत.

हे ही वाचा : सोशल मीडियावर ट्रेंडिंग 'स्मायली' काढतेय भाजप नेत्यांना चिमटे; पण ही स्मायली आहे तरी कोण ?

कोरोना रूग्णांना उपचार मिळावेत, यासाठी हॉरिझॉन प्राईम या रूग्णालयाला कोविड रूग्णालय म्हणून रूपातंरीत केले आहे. या रूग्णालयात १२० खाटांची सोय आहे. सध्या ४०-५० कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपासून २५ टक्के खाटा फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या असून या रूग्णांवर महात्मा फुले योजनेतंर्गत मोफत उपचार होतील.
- डॉ. ऋषिकेश वैद्य, वैद्यकीय संचालक, पल्मोनरी फिजिशियन क्रिटिकल केअर तज्ज्ञ, हॉरिझॉन प्राईम रुग्णालय

Free treatment for corona sufferers in Thane, Facilities for the needy under Mahatma Phule Yojana


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free treatment for corona sufferers in Thane, Facilities for the needy under Mahatma Phule Yojana